
माणदेश एक्स्प्रेस न्यूज|मुंबई : इराण-इस्रायल दरम्यान युद्धबंदीच्या सकारात्मक संकेतांनी आणि जागतिक बाजारपेठांतील जोरदार पाठबळामुळे भारतीय शेअर बाजारात बुधवारी प्रचंड तेजी पाहायला मिळाली. सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी कायम राहिली असून गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास अधिकच बळावला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ७०० अंशांनी वधारून ८२,७५६ वर बंद झाला. तर निफ्टी २०० अंशांची उसळी घेत २५,२४५ या २०२५ सालातील उच्चांकावर बंद झाला. मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही तेजी राहिली. निफ्टी मिडकॅप निर्देशांक २५९ अंशांनी वधारून ५८,८८० वर पोहोचला.
प्रमुख तेजीचे ५ कारणे:
- युद्धबंदीचा दिलासा: इस्रायल-इराण दरम्यान तणाव निवळण्याचे संकेत.
- जागतिक बाजारपेठ सकारात्मक: कोस्पी, शांघाय कंपोझिट, हँगसेंग या बाजारांमध्ये तेजी.
- कच्च्या तेलाच्या किमतीत घट: ताज्या घडामोडींनंतर गुंतवणूकदारांना दिलासा.
- रुपया मजबूत: डॉलरच्या तुलनेत रुपया १३ पैशांनी मजबूत.
- कॉर्पोरेट सकारात्मकता व भारत VIX मध्ये घट: अस्थिरता कमी झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये विश्वास.
कोणते शेअर्स वधारले?
आयटी क्षेत्र: इन्फोसिस, विप्रोमध्ये जोरदार वाढ.
एफएमसीजी: टाटा कंझ्युमर, नेस्ले इंडिया यांची कामगिरी उल्लेखनीय.
टायटन: दागिन्यांच्या व्यवसायातील अपेक्षित वाढीमुळे ३% ची उसळी.
ऑटो शेअर्स: मारुती, M&M मध्ये १-२% ची वाढ.
विशेष शेअर्स:
केएनआर कन्स्ट्रक्शन – ऑर्डर मिळाल्यानंतर ९% उसळी
समन कॅपिटल – १५% वाढ
एमसीएक्स – सकारात्मक ब्रोकरेज नोटमुळे ५% उसळी
व्होडाफोन आयडिया – सलग ३ सत्रात १०% वाढ
कुठे दिसली घसरण?
सार्वजनिक क्षेत्र व संरक्षण क्षेत्रातील शेअर्सवर दबाव राहिला. BEL, माझगाव डॉक, HAL यामध्ये २-३% ची घसरण.
गेल्या काही दिवसांत निर्माण झालेला तणाव निवळत असल्याने आणि देशांतर्गत गुंतवणूक सकारात्मक होत असल्याने बाजारात सध्या तेजीचे वातावरण आहे. गुंतवणूकदारांचे भावनिक गणित आणि जागतिक घटनांची दिशा लक्षात घेऊन पुढील सत्रेही उत्साहवर्धक राहण्याची शक्यता आहे.