माणदेश एक्सप्रेस न्युज/सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी येत्या 4 जून रोजी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे होणार आहे. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी सुरु असलेले कामकाज व व्यवस्थेची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज पहाणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मत मोजणीच्या अनुषंगाने या ठिकाणी आवश्यक ती सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. मत मोजणी केंद्राच्या ठिकाणी आवश्यक त्या सेवा सुविधांबाबत संबंधितांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिल्या.