जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू

0
96

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहला प्रतिष्ठित विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅक २०२५ मध्ये जगातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून घोषित करण्यात आले. त्याचबरोबर भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिला वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा सन्मान देण्यात आला. तर, सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटूचा मान निकोलस पूरनला मिळाला.

 

 

जसप्रीत बुमराहने गेल्या वर्षी २० पेक्षा कमी सरासरीने २०० विकेट्स घेतल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो इतिहासातील पहिला कसोटी गोलंदाज ठरला. यामुळेच विस्डेनचे संपादक लॉरेन्स बूथ यांनी जसप्रीत बुमराहचे ‘स्टार ऑफ द इयर’ म्हणून उल्लेख केला. बुमराहने १५ पेक्षा कमी सरासरीने ७१ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. जूनमध्ये कॅरिबियनमध्ये झालेल्या टी२० विश्वचषकात भारताच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये बुमराहने एकट्याने १३.०६ च्या सरासरीने ३२ विकेट्स घेतल्या. बूथने यांनी जसप्रीत बुमराहला सर्वात घातक गोलंदाज म्हटले आहे. याशिवाय, तो जगातील महान खेळाडूंपैकी एक असल्याचाही त्यांनी दावा केला.

 

 

स्मृती मानधना हिला विस्डेनने जगातील सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून घोषित केले. मानधनाने २०२४ मध्ये सर्व फॉरमॅटमध्ये एकूण १ हजार ६५९ धावा केल्या, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एका कॅलेंडर वर्षात महिला खेळाडूने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. यात चार एकदिवसीय शतकांचाही समावेश आहे, जो आणखी एक विक्रम आहे. जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या टी२० सामन्यात भारताने दहा विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात मानधनाने तिचे दुसरे कसोटी शतक (१४९ धावा) झळकावले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here