
माणदेश एक्सप्रेस/सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती जाहीर केली. आज सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता २.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचं केंद्र जमिनीपासून ५ किमी खाली होते. सांगोला येथे भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचं पुढे आले आहे.
याआधी मंगळवारी भारतातील पूर्व भागातील कोलकाता, इंफाल येथे भूकंपाचे धक्के जाणवले. २८ मार्च रोजी नेपाळला आलेल्या भूकंपाचे धक्के बिहारच्या सिलीगुडी आणि आसपासच्या परिसरात बसले. २ एप्रिल रोजी सिक्किमच्या नामची येथे तर १ एप्रिलला लेह लडाखमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. ३१ मार्च रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग, शी योमी, सिक्किममधील गंगटोकमध्येही जमिनीला हादरे बसले. २९ मार्च रोजी हरियाणाच्या सोनीपत येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. इथं दुपारी २ वाजून ८ मिनिटांनी २.३ रिश्टर स्केल भूकंपाने जमीन हादरली होती.