तिळाचे तेल वापरण्याचे ‘७’ फायदे, आरोग्य राहील चांगले.. तसेच चरबीही होते कमी

0
147

Helth Tips :  तिळाच्या तेलामध्ये अनेकविध गुणधर्म असतात. एकच नाही तर त्याचे अनेक फायदे आहेत. अन्नामध्ये या तेलाचा वापर केला जातो. मात्र सगळेच करतात असे नाही. हे तेल फारच पौष्टिक असते.

 

चमचाभर तिळाचे तेल आठवड्यातून ३ ते ४ वेळा वापरल्याने अनेक कमालीचे फायदे मिळवता येतात. मग ते तुम्ही अन्नात वापरा किंवा लावायला वापरा.

 

1) तिळाच्या तेलामुळे झोपेचा त्रास कमी होतो. अनेकांना शांत झोप लागत नाही. मात्र तिळाच्या तेलामुळे छान झोप लागते. मग त्या तेलाने मालीश करा किंवा ते नाभीमध्ये लावा.

2) केसांच्या आरोग्यासाठी हे तेल फार फायदेशीर असते. जर केस गळत असतील तर तिळाचे तेल वापरा. तसेच केस पातळ होत असतील तर केसांची मजबुतीही या तेलामुळे सुधारते.

 

3) दातांसाठी तसेच हिरड्यांसाठी तिळाचे तेल फार गुणकारी असते. हिरड्यांना जर काही कारणांमुळे सुज आली असेल तर सुजही गायब होते.

 

4) तिळाचे तेल वजन कमी करण्यासाठी मदत करते. चरबी कमी करण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापर केला जातो. खाण्यातही वापरा तसेच मसाजही करा.

 

5) हृदयाचे विविध आजार होण्यापासून तिळाचे तेल वाचवू शकते. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हे तेल वापरणे उत्तम ठरते.

 

6) तळव्यांचे दुखणे ही एक वाढती समस्या आहे. तळवा दुखायला लागला की काही सुचतच नाही. तिळाच्या तेलाचा वापर करून हे दुखणे थांबवता येते.

 

7) हाता-पायांना तसेच बोटांना सारखी सुज येत असेल तर तिळाचे तेल वापरा. या तेलामुळे शरीराला येणारी सुज कमी होते. त्वचाही चांगली होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here