बिहारच्या पाटणामधून मोठी बातमी समोर येत आहे. दिघा शहरातील प्रसिद्ध शाळेच्या बाहेरील नाल्यात एका 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. आदल्या दिवशी शाळेत गेलेला मुलगा परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेत होते. आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढण्यात आला. घटनेचे वृत्त पसरताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.
मुलाच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर हत्येचा आरोप केला आहे. संतप्त झालेल्या लोकांनी आज सकाळी शाळेला आग लावली. तसेच शाळेत घुसून तोडफोड केली. दिघा पल्सन रोड अडवून प्रचंड गोंधळ निर्माण केला. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पाटणा शहराचे एसपी चंद्रप्रकाश आणि डीएसपी घटनास्थळी उपस्थित आहेत. परिसरात तणावाचे वातावरण आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत मुलाचे नाव आयुष कुमार असे 4 वर्षीय विद्यार्थी आहे. तो टिनी टॉट स्कूलमध्ये शिकत होता. त्याचे वडील शैलेंद्र राय यांनी सांगितले की, आयुष काल शाळेत गेला होता. दुपारच्या सुट्टीनंतर तो शाळेतच ट्यूशनचा अभ्यास करायचा, मात्र सायंकाळपर्यंत तो घरी आला नाही. त्याची आई त्याला घेयला गेली असता तो शाळेत सापडला नाही. शाळेतील कर्मचारी व वर्गातील मुलांना विचारणा करूनही त्याचा पत्ता लागला नाही.
शहरभर त्याचा शोध घेण्यात आला, मात्र तो कुठेच सापडला नाही. मुलगा नाल्यात पडला असावा या भीतीने एका व्यक्तीने नाल्यात डोकावले असता आयुष तेथे पडलेला दिसला. त्याला बाहेर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना पाहून लोक संतप्त झाले. या प्रकरणाची पोलिसात नोंद करण्यात आली आहे कुटुंबीयांनी आयुषच्या हत्येचा आरोप केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी लोकांनी दानापूर-गांधी मैदान रस्ता अडवला. दिघा आशियाना मोर आणि दिघा राम जी चक बाटा पेट्रोल पंपाजवळ जाळपोळ करण्यात आली. शाळेच्या इमारतीलाही आग लागली. तसेच तोडफोड केली. त्याला अडवणाऱ्या लोकांना मारहाण केली. या गोंधळाची माहिती मिळताच पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मुलाच्या कुटुंबीयांनी त्याचा खून करून मृतदेह गटारात फेकल्याचा आरोप केला आहे. परिसरात तणावाचे वातावरण आहे.