मुंबई आणि नवी मुंबईला जोडणार्याल अटल सेतूवर एका 38 वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. गाडीमधून उतरून त्याने समुद्रात उडी घेतल्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. हा युवक डोंबिवलीचा रहिवासी होता. न्हावा शेवा पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. अटल सेतूवरील ही दुसरी आत्महत्येची घटना आहे. दरम्यान अटल सेतूवर वाहनं मध्येच थांबवण्यास बंदी आहे.
अटल सेतूवरील ही आत्माहत्येची घटना 24 जुलै दुपारी 12 च्या सुमाराची आहे. सध्या या इंजिनिअर मुलाचा शोध सुरू आहे. टाटा नेक्सॉन कार मधून येऊन त्याने पूलाच्या कडेला गाडी लावली आणि गाडीतून उतरून थेट समुद्रात उडी मारली आहे. सुन्न करणार्याु या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडीयात शेअर केला जात आहे. अटल सेतू वर आत्महत्या सारखे प्रयत्न रोखण्यासाठीच काही ठिकाणी पुलाच्या कडेला पत्रे लावण्यात आले आहेत.
अटल सेतू वर तरूणाची आत्महत्या:
A man jumped from MTHL yesterday.
Search operation on.#Mumbai pic.twitter.com/HfUyY1WqPa
— Vivek Gupta (@imvivekgupta) July 25, 2024