30 वर्षीय बँकरचा काम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ; पहा व्हिडीओ

0
24

 

उत्तर प्रदेशातील महोबा येथे एका 30 वर्षीय बँकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. राजेश कुमार शिंदे असे मृताचे नाव असून ते एचडीएफसी शाखेतील कृषी महाव्यवस्थापक होते. ही घटना 19 जून रोजी घडली. या घटनेचा एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे, ज्यामध्ये राजेश त्यांच्या लॅपटॉपवर काम करताना दिसत आहेत. त्यानंतर अचानक ते त्यांच्या खुर्चीवरून खाली कोसळलतात. त्यांच्या शेजारी बसलेल्या सहकाऱ्यांनी पटकन इतरांना सावध केले आणि राजेश यांना डेस्कवरून एका मोकळ्या जागेत हलवले. त्यांनी राजेशच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले आणि सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. परंतु, राजेशची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेले, मात्र, तोपर्यंत उशीर झाला झाला. राजेश यांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here