२२व्या मजल्यावरून उडी घेणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा मृत्यू; विक्रोळीतील थरारक घटना

0
285

माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई : मुंबईत सोमवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय हर्षदा तांदोलकर या तरुणीने २२व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मुसळधार पावसात घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

हर्षदाने २२व्या मजल्यावरील टेरेसवरून थेट खाली उडी घेतली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, उडी घेतल्यानंतर ती थेट इमारतीच्या पायऱ्याजवळ उभ्या असलेल्या दुचाकीवर कोसळली. त्यामुळे मृतदेहाचे दोन तुकडे झाले आणि घटनास्थळ भयावह झाले होते. रक्ताचा सडा पडलेला दिसून आला.

 

घटना घडल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हर्षदा तणावाखाली होती, मात्र आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी विक्रोळी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here