लाडक्या बहिणींच्या खात्यावर आजपासून पैसे जमा होणार

0
1940

माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता वेळेच्या आधीच मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीचा हप्ता आजपासून द्यायला सुरुवात होणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. दरम्यान, यावेळी जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीत लाभार्थींची संख्या घटण्याची शक्यता आहे.

 

 

लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. पण आता लाडकी बहिण योजनेचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील ५ लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारीअखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला होत्या. मात्र, अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही. मात्र, त्यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

 

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाख होणार आहे. यापूर्वी 5 लाख महिलांची नावं कमी करण्यात आली होती. आता नव्याने 4 लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here