मुंबई : होर्डिंग कोसळून ८ जणांचा मृत्यू ; ५९ जण जखमी ;

0
1

मुंबईतील वादळामुळे घाटकोपरच्या येथील पेट्रोल पंपावर मोठं लोखंडी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून ५९ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच आतापर्यंत ६७ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
ही घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेची माहिती मिळताच मी लगेच मुंबई महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याठिकाणी महापालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत. तसेच बचावकार्य सुरू आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून आर्थिक मदत
दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारद्वारे आर्थिक मदत देणार असल्याची माहिती दिली. या घटनेत जखमी झालेल्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असून या घटनेत ज्यांच्या मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री साहायता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितलं.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here