‘या अली’ गाण्याच्या गायकाचे अकाली निधन, स्कूबा डायव्हिंगदरम्यान दुर्दैवी अपघात

0
175

माणदेश एक्सप्रेस न्युज | गुवाहाटी –
भारतीय संगीतविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘या अली’ गाण्यामुळे घराघरात पोहोचलेले आणि असमचे लोकप्रिय गायक जुबीन गार्ग यांचे वयाच्या ५२व्या वर्षी निधन झाले. सिंगापूर येथे स्कूबा डायव्हिंग करत असताना त्यांना श्वसनात अडचण निर्माण झाली. त्यानंतर तातडीने त्यांना सिंगापूर जनरल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.


नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी जुबीन गार्ग सिंगापूरला गेले होते. परफॉर्मन्सपूर्वी ते स्कूबा डायव्हिंगसाठी गेले असता अचानक त्यांना श्वसन समस्या उद्भवली. बचाव पथकाने त्यांना समुद्रातून बाहेर काढून रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, आयसीयूमध्ये उपचारही सुरू होते; पण अखेर सर्व प्रयत्नांना अपयश आले.


  • जन्म: १८ नोव्हेंबर १९७२, मेघालय

  • त्यांनी ६० हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत – असमिया, हिंदी, बंगाली, इंग्रजी, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओडिया, संस्कृत इत्यादी.

  • बॉलिवूडमध्ये गँगस्टर चित्रपटातील “या अली” या गाण्यामुळे ते विशेष प्रसिद्ध झाले.

  • दिल से (१९९८), फिझा (२०००), कांटे (२००२) अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी आपला आवाज दिला.

  • गायक असूनही ते अभिनेता, संगीतकार, गीतकार आणि लेखक होते.

  • जवळपास १२ वाद्ये ते वाजवू शकत होते.


जुबीन यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये व कलाविश्वात शोककळा पसरली आहे.
असमचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले – “असमने आज आपला प्रिय पुत्र गमावला. त्यांचे योगदान अविस्मरणीय राहील.”
फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे.


संगीताची अनोखी जाण, विविध भाषांतील अप्रतिम गाणी, आणि असमच्या संस्कृतीला जागतिक पातळीवर नेणारे जुबीन गार्ग यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीतविश्वात अपूरणीय पोकळी निर्माण झाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here