ईश्वरपुरात युवकाची आत्महत्या

0
1

ईश्वरपूर / प्रतिनिधी : ईश्वरपूर महादेवनगर परिसरात राहणा-या प्रतिक सुहास पाटोळे वय २६ मुळ रा. पेठ वडगांव ता. हातकणंगले या युवकाने दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरूवार दि. २६ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. याबाबत अर्जुन अरूण लोंढे रा. शिवनगर यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रतिक पाटोळे हा महादेवनगर परिसरात राहतो. दि. २६ रोजी त्याने राहत्या घरातील छताच्या लाकडी तुळीला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास पोलिस करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here