पुणे महापालिकेच्या पहिल्या महिला नगरसचिव योगिता भोसले…

0
154

माणदेश एक्सप्रेस/पुणे : महापालिकेच्या नगरसचिवपदी योगिता भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या प्रभारी नगरसचिव म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांना नगर सचिवपदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे भोसले यांच्या रूपाने पुणे महापालिकेला पहिल्या महिला नगरसचिव मिळाल्या आहेत.

 

योगिता भोसले यांची झालेली निवड अतिशय योग्य आहे. पहिल्या महिला नगरसचिव होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. नगरसचिव कार्यालयात गेली अनेक वर्षे त्या काम करीत आहेत. कुठल्याही राजकारणाला बळी न पडता नियमाप्रमाणे त्या काम करीत आहेत, अशा शब्दांत माजी महापौर संघटनेच्या अध्यक्ष राजलक्ष्मी भोसले, सचिव कमल व्यवहारे आणि निमंत्रक अंकुश काकडे यांनी अभिनंदन केले.