‘येड लागलं प्रेमाचं’ फेम अभिनेत्रीचा लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

0
180

लोकप्रिय अभिनेत्री माधुरी पवारने (Madhuri Pawar) तिचा दमदार अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्रीने अप्सरा आली या रिअॅलिटी शो च्या विजेतेपद जिंकून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष स्वत कडे वेधून घेतलं होतं. माधुरी अभिनय क्षेत्राच्या बरोबरीने आता सोशल मीडियावर सुद्धा चांगलीच सक्रिय झाली आहे. त्याद्वारे विविध रील्स व्हिडीओ शेअर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. नुकताच तिने मराठमोळ्या अंदाजात एक डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री ‘नवरी नटली…’ या लोकप्रिय गाण्यावर डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

अभिनेत्री माधुरी पवार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिच्या सोशल मीडियावर अनेकदा तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्या आता माधुरीने लोकप्रिय मराठी गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे. लोकप्रिय मराठी गाणं “खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली…” या गाण्यावर जबरदस्त असे एक्स्प्रेशन्स देत अभिनेत्री थिरकली आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये माधुरी पवार हिरवी साडी, कानात मोठे कानातले आणि हातात हिरव्या बांगड्या अशा मराठमोळ्या अंदाजात ती पाहायला मिळते आहे. तिचे कमाल एक्स्प्रेशन्स पाहून चाहते सुद्धा भारावून गेले आहेत.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here