आटपाडीत प्राथमिक शिक्षकाकडून महिलेचा विनयभंग ; पोलिसात गुन्हा दाखल

0
5256

माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील एका प्राथमिक शिक्षकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती व तिचा भाऊ यांनी यातील आरोपी पोपट सुखदेव सूर्यवंशी यांना कोरोना काळात पैसे दिले होते. सदरचे पैसे मागण्यासाठी, फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ आरोपीचे घरी कुचेकरवाडी, पळसखेल ता. आटपाडी येथे गेले होते.

यावेळी आरोपीने फिर्यादीला तुझे पैसे मिळणार नाहीत. तुला काय करायचे आहे ते कर, असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळी करत, फिर्यादीचे अंगास झटापट करून, तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

मी मोठा माणूस आहे. मी अनेकांना जेलमध्ये बसवले आहे. मी तुम्हांला पण कामाला लावतो, असे म्हणत दमदाटी करून तुम्ही मला परत पैसे मागितले तर तुम्हांला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आहे.फिर्यादीचे फिर्यादी नुसार गुन्हा नोंद असून आटपाडी पोलीस सदर गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here