
माणदेश एक्स्प्रेस/ शिराळा : तडवळे ( ता.शिराळा) येथील सुनंदा पांडुरंग पाटील (वय ४५) या महिलेचा अंगावर वीज पडून जागेवरच मृत्यू झाला. चप्पल विसरले ते आणण्यासाठी त्या परत शेतात गेल्या आणि वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.२५) घडली. वादळी वाऱ्यामुळे गावातील अनेक घरांचे पत्रे, कौले उडून गेली आहेत.
याबाबत माहिती अशी की, मयत सुनंदा पाटील मोरणा धरणाजवळील शिप्याची नाळ येथे शेतात भांगलन करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळच्या दरम्यान विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यावेळी भांगलन करणाऱ्या सुनंदा पाटील यांच्यासह सर्वजण घरी येण्यासाठी निघाल्या होत्या. गडबडीत सुनंदा यांचे चप्पल विसरले ते आणण्यासाठी त्या माघारी फिरल्या. यावेळी त्यांच्या अंगावर वीज पडली व त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.