
माणदेश एक्सप्रेस न्यूज| मुंबई:
उद्धव ठाकरे यांनी मतांच्या चोरीसंदर्भात मोठा दावा करत महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईत गणेश मंडपासाठी खड्डे खोदल्याबाबत १५ हजारांचा दंड लावण्याच्या निर्णयावर त्यांनी सरकारवर थेट टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “हा दंड गणेश मंडळांनी भरणार नाही.” याशिवाय, कोकणातील गोवा-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांची अडचण होत असून, त्या खड्ड्यांना वेळेत दुरुस्त न करणाऱ्या सरकारलाच आता दंड लावण्याची वेळ आली आहे.
‘मातोश्री’वर भाजप-राष्ट्रवादी पक्षप्रवेश; उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा
उद्धव ठाकरे यांचा गट सध्या मोठ्या खिंडाराच्या समोर आहे. पक्षातून सतत गळती होत असून, त्याचा थांबता नाही. मात्र, याच काळात ‘मातोश्री’वर आयोजित कार्यक्रमात विदर्भ व मुंबईमधील काही भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करताना दिसले.
या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत सांगितले की, “हे लोक मतांची चोरी करून सत्तेत आले आहेत. ही चोरी आता पकडली गेली आहे. अनेकजण सत्ताधारी महायुतीत गेले, पण भाजपाची सत्ता जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी कपाळावर हात ठेवून बसण्याचा दिवस आला आहे.”
विरोधी खासदारांना अटक, निवडणूक आयोगासमोर तोंड न उघडता; यावरही उद्धव ठाकरे यांचा आरोप
उद्धव ठाकरे म्हणाले, “देशात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहत आहोत. ३०० खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन प्रश्न विचारायचे होते, पण त्यांना त्यासाठी परवानगी दिली गेली नाही. विरोधी पक्षाच्या खासदारांना अटक करण्यात आली. पण आता लोकांच्या डोळ्यांवरील पट्ट्या हळूहळू उतरू लागल्या आहेत.”
भ्रष्टाचाराच्या बाबतीत सरकार निष्क्रिय; लोकांनी याला सहन करणे थांबवले पाहिजे
ठाकरे यांनी महायुतीवर भ्रष्टाचाराचा आरोप करत पुढे सांगितले, “महाराष्ट्रात बेबंदशाही व भ्रष्टाचार वाढत चालले आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. पुरावे असल्यासही त्यांना संरक्षण मिळत आहे. हे किती दिवस सहन करायचे?”
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दिल्लीमध्ये लढणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने अडथळे निर्माण केले असल्याचा उल्लेख करत ते म्हणाले, “लोकांनी निवडून दिलेले खासदार सरकारला प्रश्न विचारू शकत नाहीत. म्हणूनच, जनतेच्या न्यायासाठी लढणं हीच आमची प्रतिज्ञा आहे.”