
माणदेश एक्सप्रेस न्युज|मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या चर्चांवर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.
उदय सामंत म्हणाले, “राज ठाकरेंच्या समोर घातलेल्या अटी म्हणजे शाळेतल्या मुलांसारख्या आहेत. राज ठाकरे इतके लहान नेते नाहीत की ते अटी-शर्ती मानतील. उद्या जर राज ठाकरेंनी अशी अट लावली की ‘राहुल गांधींना भेटू नका’, तर उद्धव ठाकरे काय करतील? ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांवर पुढील काळात कोण कोणाकडे टाळी मागतोय ते पाहणं महत्वाचं असेल.”
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीबाबत चर्चेवर अजूनही गडबड सुरू असून, राजकीय वर्तुळातील लक्ष या पुढील घडामोडींवर आहे.