
माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी : मिटकी (ता. आटपाडी) – गावातील श्री संत बाळूमामा मंदिराच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा पार करत आज मोठा शुभारंभ पार पडला. मंदिरातील सभामंडप बांधकाम व वाघमोडे वस्तीला जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरण कामांचा शुभारंभ सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या हस्ते झाला.
या शुभ प्रसंगी तानाजीराव पाटील यांनी बाळूमामांचे दर्शन घेत आरतीमध्ये सहभागी होऊन धार्मिक विधी पूर्ण केले. या कार्यक्रमाला मान्यवर, गावकरी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार सुहासभैय्या बाबर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा सोहळा शक्य झाला असून, त्यांनी बाळूमामा मंदिर सभामंडपाच्या भूमिपूजनासाठी आवश्यक ती मदत केली. तसेच, खासदार विशाल पाटील यांच्या निधीतून वाघमोडे वस्तीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आर्थिक मदत मिळाली, ज्यामुळे या भागाचा विकास अधिक वेगाने होणार आहे.
शुभारंभ सोहळ्यात दत्तात्रय पाटील पंच, मनोज नांगरे पाटील, जगन्नाथ कोळपे सर, माजी सरपंच दादा कोळेकर, माजी डेप्युटी सरपंच मारुती जरग, भीमराव यमगर, आत्माराम पडळकर, ब्रह्मदेव जरग, संजय यमगर, विशाल वाघमोडे, नवनाथ कटरे, जालिंदर कटरे, आप्पा कोळपे, राजेंद्र मगर, विक्रम यमगर आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री संत बाळूमामा यांच्या कृपेने व या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे गावाचा सर्वांगीण विकास आता वेगाने होत आहे. या नव्या सभामंडपामुळे मंदिराचा सौंदर्य आणि भक्तांचे सोयीसुविधा वाढणार आहेत, तसेच रस्त्याच्या डांबरीकरणामुळे वाघमोडे वस्तीतील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात सोय होईल.
ग्रामस्थांत या विकासकामांबाबत समाधानाचे वातावरण असून, प्रत्येकजण उत्साहाने पुढील कामांची वाट पाहत आहे. आमदार सुहास भैय्या बाबर आणि तानाजीराव पाटील यांनी गावाच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न मान्य करत गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.
या प्रकल्पामुळे केवळ धार्मिक क्षेत्र नव्हे तर सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही गावाला मोठा फायदा होणार आहे. येथील नागरिकांनी या पुढील कामांसाठी देखील सहकार्य करण्याची तयारी व्यक्त केली आहे.
श्री बाळूमामा मंदिर सभामंडप बांधकाम व वाघमोडे वस्तीला जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणामुळे मिटकी गावाचा विकास नक्कीच नवे पर्व गाठेल अशी सर्वांना अपेक्षा आहे.