
माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. यल्लापा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मिडीया प्रदेश संघटकपदी, उदय बाड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी तसेच सुशांत लांडगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मिडीया सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी सुभाष कुचेकर, प्रशांत सावत, नरेंद्र दिक्षीत, बंडू सरगर, संतोष बिराजदार, सुनिल पाटील, स्वप्निल हाके, जोगेश्वर बाड, विक्रम पुजारी, गोपी पवार, कुंडलिक ऐवळे, सुरज ऐवळे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
सत्काराच्या वेळी सर्व उपस्थितांनी नव्या पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या निवडीमुळे पक्षाची सोशल मिडीया व युवक संघटना अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला गेला.