कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला; अथणीत कार-बस अपघातात चौघांचा मृत्यू, एक जखमी

0
224

माणदेश एक्सप्रेस न्यूज|कोल्हापूर 

कोल्हापूरहून महालक्ष्मी देवीचे दर्शन करून परतत असताना कर्नाटकातील अथणीजवळ रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा मृत्यू झाला, तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. जेवर्गी-संकेश्वर राज्य मार्गावर तांबाहून मिरजकडे जाणाऱ्या एसटी बसची आणि अफजलपूरकडून येणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर बसमधील प्रवासी सुखरूप बचावले आहेत.

अपघाताची सविस्तर माहिती

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:

  • गिरीश अशोक बेळोरगी (वय २८), चालक

  • संगमेश गिरीश अमरगोंड (वय २६)

  • राहुल मेळशी

  • राधिका राहुल मेळशी (वय २२)

हे सर्वजण अफजलपूर (जि. कलबुर्गी, कर्नाटक) येथील रहिवासी होते. अपघातात जखमी झालेला विनायक तिवारी याच्यावर अथणीच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघात कसा घडला?

रविवारी सकाळी सुमारे ११ वाजता, कोल्हापूरहून परतत असलेल्या कारची समोरून भरधाव येणाऱ्या बस (क्रमांक K28 F 2470) सोबत तांबाहूनजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेनंतर कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आणि तीतील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एका महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला.

पोलिस तपास सुरू

या अपघाताची माहिती मिळताच अथणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मल्लिकार्जुन उपार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रस्त्यावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठा प्रयत्न केला.

अपघातगस्त मार्ग

अथणी-विजापूर या राज्य मार्गावर गेल्या तीन महिन्यांत हा तिसरा भीषण अपघात असून या मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या बाबत संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here