
Health benefits with high nutritional value : मटण, चिकन आणि मासे, हे तिन्ही मांसाहारी पदार्थ खूप लोकप्रिय आहेत. तिन्हींचे स्वतःचे फायदे आणि पौष्टिकता आहेत. काहींमध्ये प्रथिने भरपूर असतात तर काहींमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. अशा परिस्थितीत, अनेकदा प्रश्न पडतो की कोणता मांसाहारी पदार्थ अधिक आरोग्यदायी आहे? तुम्हीही या संभ्रमात असाल तर आपण आजच्या याबद्दल जाणून घेऊयात…
आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण निरोगी आहार घेत असतो. तसेच आहारात प्रथिनांचे असणे देखील फार गरजेचे असते. यासाठी आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करावा. तर मुख्यत: चिकन, मटन, मासे यामध्ये या पदार्थांमध्ये प्रथिनांचा मुख्य स्त्रोत आहे. पण या तिन्ही मांसहारी पदार्थांमध्ये वेगवेगळी पोषणत्त्वे आढळतात. तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर या मांसहारी पदार्थांची केवळ चव पुरेशी ठरणार नाही तर त्यांचे परिणाम आरोग्यावर वेगवेगळे होत असतात. यासाठी आजच्या या लेखात आपण चिकन, मटण आणि मासे यांच्यातून शरीराला होणारे फायदे व नुकसान हे दोन्ही जाणून घेऊयात…
अशातच तुम्हीही तुमच्या हेल्दी लाईफस्टाईलकरिता या तिन्ही मांसहारी पदार्थांपैकी कोणता पदार्थ खाणे योग्य असेल याबद्दल संभ्रमात असाल तर पौष्टिक मूल्यांच्या आधारावर चिकन, मटण आणि मासे यापैकी कोणता मांसाहारी आहार आरोग्यदायी पर्याय आहे हे जाणून घेऊया.
चिकन, मटण आणि मासे…
चिकन, मटण आणि माशांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. यात आता आपण जर चिकनबद्दल सांगायचं झाले तर त्यात प्रथिने सर्वाधिक असतात. 100 ग्रॅम चिकनमध्ये सुमारे 31 ग्रॅम प्रथिने, 165 Kcalकॅलरीज आणि 3.6 ग्रॅम फॅट असते. तर 100 ग्रॅम मटणमध्ये 294 Kcal कॅलरीज, 25 ग्रॅम प्रथिने आणि 20 ग्रॅम फॅट असते. त्यात 100 ग्रॅम माशांमध्ये 208 Kcal कॅलरीज असतात. याशिवाय 20 ग्रॅम प्रथिने आणि 13 ग्रॅम फॅट आढळते.
प्रथिनेयुक्त चिकन
सर्वप्रथम चिकनबद्दल बोलायचे झाले तर, चिकन हे सर्वात जास्त प्रमाण खाल्ले जाणारे आणि आवडणारे नॉन-व्हेज आहे. तर चिकन हे प्रथिने समृद्ध असल्याने फॅटचे प्रमाण खूप कमी आहे, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये चिकनचा समावेश केला जातो. यासोबतच त्यात व्हिटॅमिन बी 6 आणि नियासिन सारखे आवश्यक जीवनसत्त्वे देखील असतात जे शरीराची ऊर्जा पातळी राखण्यास मदत करतात.
मटणाचे आरोग्यास होणारे फायदे
मटणामध्ये लोह आणि जस्त भरपूर प्रमाणात असते, जे हिमोग्लोबिन वाढवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. याशिवाय मटण हे उच्च-कॅलरी आणि उच्च-ऊर्जा असलेले पदार्थ आहे, म्हणून ज्यांना खूप शारीरिकरित्या खूप काम करावे लागतात किंवा ज्यांना जास्त उर्जेची आवश्यकता असते त्यांच्यासाठी मटण परिपूर्ण आहे. मटणामध्ये बी-जीवनसत्त्वे देखील असतात, विशेषतः बी१२, जे मज्जासंस्था आणि मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. मात्र मटणामध्ये फॅटचे प्रमाण थोडे जास्त असते.
मासे खाण्याचे हे फायदे आहेत
माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असल्याने याचे सेवन हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट मानले जाते. अशातच माशांमध्ये फॅटचे प्रमाण खूप कमी असते, ज्यामुळे ते हृदयासाठी अनुकूल पर्याय ठरते. मासे हा व्हिटॅमिन डी आणि आयोडीनचा चांगला स्रोत आहे, जे आपल्या शरीरातील हाडे आणि थायरॉईडच्या कार्यासाठी आवश्यक आहेत.
तिन्ही मांसहारापैकी आरोग्यासाठी कोणता जास्त फायदेशीर आहे?
तुमच्या शरीराच्या गरजेनुसार चिकन, मटण आणि मासे यांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. जर तुम्हाला जास्त प्रथिनांची गरज असेल तर चिकन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. जर तुम्हाला तुमचे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल आणि मेंदूची शक्ती वाढवायची असेल तर तुम्ही मासे खाऊ शकता. दुसरीकडे ज्यांना जास्त उर्जेची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी मटण चांगले राहील. म्हणजेच, तुम्ही तुमच्या आरोग्यानुसार तुमच्यासाठी काय योग्य आहे ते निवडू शकता किंवा तुम्ही तिन्ही आहार योग्य पद्धतीने तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता.
( डिस्क्लेमर : यामध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)