आटपाडी तहसील कार्यालयाचे व्हॉट्सअॅप चॅनेल

0
682

चॅनेलद्वारे नागरिकांच्या मोबाईलवर मिळणार माहिती

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तहसील कार्यालयाने डिजिटल युगाशी सुसंगत असा अभिनव उपक्रम हाती घेत अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनेल सुरू केले आहे. या चॅनेलच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजना, महत्त्वाचे निर्णय, प्रमाणपत्रासंबंधी मार्गदर्शन, हवामानविषयक माहिती, आपत्ती व्यवस्थापन, कृषी, महसूल, निवडणूक आदी विभागांची माहिती नियमितपणे मिळणार आहे.

 

या माध्यमातून नागरिकांचा वेळ, श्रम आणि अनावश्यक फेर्यां पासून सुटका होणार आहे. तहसील कार्यालयात नागरिकांना चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी ”व्हॉट्सअॅप चॅनेल” सारखी सहज वापरता येणारी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. नागरिकांना या चॅनेलमध्ये जोडण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. हा उपक्रम इतर तालुक्यांसाठीही मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा असल्याचे तहसीलदार सागर ढवळे यांनी सांगतिले.

 

व्हॉट्सअॅंप चॅनेलवरून मिळणारी माहिती
तहसील कार्यालय आटपाडी नावाने सुरू केलेल्या व्हॉट्सअॅप चॅनेल रून नागरिकांना विविध प्रमाणपत्रांसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, अर्ज कसा करायचा, कुठे सादर करायचा याचे मार्गदर्शन, नोंदणीप्रक्रिया, हवामान अंदाज, पीकविमा योजनांची माहिती, शासकीय आदेश, निवडणुकीशी संबंधित सूचना आणि आपत्तीपूर्व खबरदारीबाबतच्या सूचना तसेच शासकीय व तहसील कार्यालयाची प्रसिद्ध झालेल्या बातम्या नागरिकांना मिळणार आहे.

 

 

तहसील कार्यालय आटपाडी या चॅनेलमुळे गावपातळीवर सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. सबस्क्राइब करण्यासाठी नागरिकांना फक्त संबंधित लिंकवर क्लिक करून जॉइन बटन दाबावे लागेल. कोणताही अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. ही सेवा पूर्णपणे मोफत असून, कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करावी लागत नाही. या चॅनेलद्वारे माहितीचा वेग वाढेल, आणि लोकांचा प्रशासनावरचा विश्वास अधिक बळकट होईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here