तेल, वाफ, चहा, आगीमुळे भाजल्यास काय करावे? जाणून घ्या तात्काळ घरगुती उपाय

0
183

माणदेश एक्सप्रेस न्यूज | आरोग्य विशेष

स्वयंपाकघरात घाईगडबडीत काम करताना अनेकदा गरम तेल, वाफ, चहा, आगीचा संपर्क किंवा गरम भांडी यामुळे त्वचा भाजते. अशी भाजलेली त्वचा असह्य वेदना आणि त्रास देऊ शकते. अनेकांना अशा वेळी प्रथम काय करावे हे समजत नाही, त्यामुळे स्थिती अधिक बिघडण्याची शक्यता असते. यासाठी काही घरगुती उपाय आणि वैद्यकीय सल्ला उपयुक्त ठरतो.

 

 

भाजल्यावर तात्काळ काय कराल?

१) भाजलेली जागा थंड पाण्याने १०-१५ मिनिटे धुवा.

२) गरम पाण्याचा किंवा बर्फाचा थेट संपर्क टाळा.

३) पाणी नसेल तर गवताची मुळे, गार दुध किंवा थंड पाण्याच्या पट्ट्या वापरा.

 

 

घरगुती उपाय

१) कोरफड (अलोवेरा) जेल:

२) कोरफड जेल जळजळ कमी करते आणि त्वचा थंड करते.

३) सूज, फोड आणि डाग टाळण्यासाठी उपयोगी.

 

 

बटाट्याचा रस:

 बटाटा किसून त्याचा रस भाजलेल्या जागी लावल्यास थंडी आणि आराम मिळतो.

नारळाचे तेल: त्वचेला थंडावा देतो आणि जळजळ थांबवतो.

                संक्रमण होण्यापासूनही बचाव करतो.

केळीचा गर: सूज कमी करण्यासाठी आणि त्वचा थंड करण्यासाठी वापरता येतो.

                टूथपेस्ट (तात्पुरती मदत):

              अँटीसेप्टिक नसली तरी थंडपणा मिळवण्यासाठी काहीजण वापरतात.

              पण डॉक्टरांच्या मते, याचा नियमित वापर टाळावा.

 

 

औषधोपचार

घरच्या घरी असतील तर सोफ्रामायसिन, लिग्नोकेन आणि सल्फासॅलाझिन या औषधांचे मिश्रण करून लावता येते.

भाजलेली जागा झाकण्यासाठी स्वच्छ, निर्जंतुक पट्टी वापरा.

तीव्र भाजल्यास त्वचेचा आतील थर जळाल्यास किंवा फोड फार मोठे असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

 

काय टाळाल?

 

बर्फ थेट भाजलेल्या भागावर ठेवू नका.

तेल, हळद, किंवा पिठाचे लेप यासारखे पारंपरिक पण अपुरे उपाय टाळा.

भाजलेली त्वचा फोडण्याचा प्रयत्न करू नका.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here