भारत पाटणकर यांच्या पत्रातील आरोप नेमके काय होते?

0
1

प्रती

आनंदराव गणपती पाटील

विषय :- आमच्या खरसुंडी व घाणंद वितरिकेवर तयार झालेल्या 12 पाणी वापर संस्थांच्या शासकीय बैठका, अंतर्गत कारभारात आपण हस्तक्षेप न करणे बाबत व सोपेकॉम संस्थेकडून आम्हाला काही वर्ष सहकार्य आवश्यक असलेबाबत.

सस्नेह नमस्कार,

दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी वारणाली येथे डॉ. भारत पाटणकर यांच्या मागणीनुसार सिंचन विभागाने खरसुंडी व घाणंद वितरिकेवरील 12 पाणी वापर संस्थांच्या पाणी मागणी, पाणीपट्टी, नुकसान भरपाई तसेच अपूर्ण कामाबाबत चर्चा” करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीचेआपणाला निमंत्रण नसताना आपण हजर राहिलात व या बैठकीमध्ये विषय पत्रिकेनुसार एकेका विषयावर चर्चा होत असताना आपण त्यात अनेकदा अडथळा आणलात. त्यामुळे विषय पत्रिकेनुसार ठरलेल्या विषयावर चर्चा पूर्ण झाली नाही. आमच्यापैकी अनेक अध्यक्षांना आमच्या समस्या व अडचणी मांडता आल्या नाही. सोपेकॉम संस्थेने आम्हाला पहिल्या आवर्तनातील पाणी मागण्या नोंदविण्यासाठी सहकार्य केले व त्यामुळे आम्हाला पहिले आवर्तन मिळाले असे असताना आपण सोपेकॉम संस्थेच्या कार्यकर्त्यांवर चुकीच्या पद्धतीने आरोप केले.

आमच्या सर्व 12 पाणी वापर संस्थांचा डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील श्रमिक मुक्ती दल पाणी संघर्ष चळवळीवर पूर्ण विश्वास असून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली व सोपेकॉम संस्थेच्या सहकार्याने काम करण्यावर ठाम आहोत.क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवाडी यांच्या नेत्रत्वाखाली सुरू झालेल्या पाणी संघर्ष चळवळी पासून डॉ. भारत पाटणकर या समान पाणी वाटप चळवळीचे नेतृत्व करीत आहेत. आज समन्यायी पाणी वाटप चळवळी चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते कष्ट घेत आहेत. खरसुंडी व घाणंद वितरीके व्यतिरिक्त निंबवडे, दिघंची व वंचित गावातील भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी वापर संस्था तयार करण्यासाठी श्रमिक मुक्ती दल पाणी संघर्ष चळवळीचे डॉ. भारत पाटणकर, साहेबराव चवरे व जनार्दन झिंबल यांच्या मार्गदर्शनखाली सोपेकॉम संस्थेला विनंती करण्यात आली आहे.

आटपाडी येथील पाणी वापर संस्थेच्या कामाबाबत जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे यांनी स्वतः संस्थेला पत्र लिहून कामाचे कौतुक केले आहे, व संस्थेला पुढील अजून काहि वर्ष काम करण्याबाबत विनंती केली आहे. कारण सोपेकॉम संस्थेची मदत घेतली नाही तर आणि जनतेची एकजूट टिकली नाही तर आटपाडी तालुक्यातील जनतेची प्रचंड नुकसान होणार आहे. आमच्या 12 पाणी वापर संस्थांनी ठराव करून सोपेकॉम संस्थेला अजून काहि वर्ष काम करण्याबाबत विनंती केली आहे. आपल्या संस्थेतील कर्मचारी श्री अमोल माने यांनी स्वेच्छेने तुमच्या संस्थेची नोकरी सोडली असून त्याबाबत लोकांमध्ये संभ्रम पसरवू नये. तसेच सोपेकॉमच्या काही कर्मचाऱ्यांना आपण मारण्याची धमकी दिलेली आहे अशी प्रकारची धमकी व अपप्रचार करू नये.

यामुळे आमच्या 12 पाणी वापर संस्थांना यापुढे या विषया संदर्भातकोणतीही चर्चा करायची नाही. तरी आपण यापुढे आम्ही आयोजित केलेल्या बैठकींना उपस्थित राहू नये तसेच आम्हाला या कामात मदत करणाऱ्या सोपेकॉम संस्थेला व त्यांच्या कार्यकर्त्यांना कोणताही त्रास देऊ नये अशी आमची नम्र व ठाम भूमिका आहे.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here