
health benifits : आपल्या रोजच्या आहारात साखरेचा वापर खूप जास्त प्रमाणात होतो. चहा, कॉफी असो की बिस्किटं किंवा मग मिठाई, बेकरी वस्तू किंवा पॅकेज्ड फूड या सगळ्यात साखरेचा वापर होतो. पण जर आपण एका महिन्यासाठी साखर पूर्णपणे टाळली, तर आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होईल असा कधी विचार केला आहे? तर याचा सकारात्मक परिणाम दिसायला मिळतो. चला जाणून घेऊयात अशा 5 महत्वाच्या बदलांविषयी..
1. त्वचा अधिक स्वच्छ दिसते
साखर शरीरात इन्फ्लेमेशन वाढवते आणि त्वचेवर मुरुम, डाग यांसारख्या समस्यांना कारणीभूत ठरते. साखर बंद केल्यावर त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि पिंपल्स कमी होतात.
2. शरीरातील ऊर्जा पातळी स्थिर राहते
साखरेमुळे ऊर्जा झपाट्याने वाढते आणि लगेचच कमी होते. पण साखर टाळल्यावर शरीर स्थिर ऊर्जा पातळीवर कार्य करते, त्यामुळे दिवसभर फ्रेश वाटतं.
3. वजन कमी होण्यास मदत होते
साखरेमध्ये भरपूर रिकाम्या कॅलरी असतात. साखर बंद केल्यावर शरीरातील कॅलरीचं प्रमाण कमी होतं आणि वजन आपोआप कमी होऊ लागतं.
4. झोपेची गुणवत्ता सुधारते
अधिक साखर घेतल्यामुळे झोपेवर परिणाम होतो. साखर टाळल्यावर झोप अधिक गाढ होते आणि शरीर अधिक रिलॅक्स वाटतं.
5. मेंदू अधिक स्पष्टपणे विचार करतो
साखरेचा अतिरेक मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो. साखर बंद केल्यावर ‘ब्रेन फॉग’ कमी होतो आणि एकाग्रता वाढते.