सध्याच्या काळात फिट राहणं फार गरजेचं झालं आहे. त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वेगवेगळे उपाय करून पाहतो. तुम्हालादेखील तुमच्या दिवसाची सुरुवात आरोग्यदायी पद्धतीने करायची आहे? तर मग दह्याशिवाय चांगला पर्याय नाही. तुमच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी पोषक घटकांनी युक्त दही हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र, तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी दही खाल्ल्यानं शरीरावर काय परिणाम होतात हे माहितीये का?
दही हा समृद्ध चव आणि असंख्य आरोग्यदायी फायद्यांसाठी जगभरातील एक लोकप्रिय आहारातील मुख्य पदार्थ आहे. “प्रोबायोटिक्स, जीवनसत्त्वे व खनिजे यांनी युक्त असलेले दही आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि कॅल्शियम व प्रथिने यांसारखे आवश्यक पोषक घटक मिळवून देण्याच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.”
रिकाम्या पोटी दही घेतल्यास फायदे
प्रोबायोटिक्सने समृद्ध दही हा प्रोबायोटिक्सचे नैसर्गिक स्रोत आहे. प्रोबायोटिक्स म्हणजे आपल्या आरोग्यासाठी हातभार लावणारे चांगले जीवाणू. जीवाणू म्हटलं, की ऐकायला थोडंसं विचित्र वाटतं खरं; पण आपल्या पोटात असे ‘चांगले’ जीवाणू असणं गरजेचं असतं. ते आपल्या पचनासाठी मदत करतात आणि आवश्यकही असतात. जे पचन सुधारून आतड्याच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात. “रिकाम्या पोटी दही खाल्ल्यानं तुमची पचनसंस्था दिवसभरासाठी तयार होण्यास मदत होते. प्रोबायोटिक्सदेखील पोषक शोषण वाढवतात, पोट फुगणं कमी करतात आणि नियमित आतड्याच्या हालचालींना समर्थन देतात.
पोषक घटकांचा चांगला स्रोत
सकाळी रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने कॅल्शियम, प्रथिने आणि ब जीवनसत्त्वे यांसारख्या आवश्यक पोषक घटकांचा शरीराला पुरवठा होतो. गोयल पुढे म्हणाले, “हे पोषक घटक ऊर्जा देतात आणि हाडांचे आरोग्य व स्नायुबल वाढवण्यासाठी मदत करतात
हायड्रेटिंग आणि कूलिंग – दह्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे शरीराला हायड्रेट करण्यास मदत करते. विशेषतः गरम हवामानात. त्याचे नैसर्गिक थंड गुणधर्म शरीरातील उष्णता कमी करू शकतात आणि निर्जलीकरण टाळू शकतात.
रिकाम्या पोटी दही खाल्ल्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत.
ॲसिडीटीचा धोका – काही लोकांसाठी रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने “ॲसिडिटी वाढू शकते.” “हे विशेषतः संवेदनशील पोट असलेल्या किंवा अॅसिड रिफ्लक्सचा धोका असलेल्या व्यक्तींसाठी आहे. दह्यामधील लॅक्टिक अॅसिड रिकाम्या पोटी एकत्रित केल्याने अस्वस्थता किंवा सूज येऊ शकते.
सर्दी संवेदनशीलतेसाठी नाही – दही नैसर्गिकरीत्या थंड आहे आणि ते श्वसनविषयक समस्या, सर्दी किंवा सायनसच्या समस्या असलेल्या लोकांसाठी योग्य असू शकत नाही. विशेषत: रिकाम्या पोटी खाल्ल्यास याचा त्रास होऊ शकतो.
दही खाण्याच्या योग्य पद्धती
नुसतेच दही खाऊ नका – नुसतेच दही न खाता ते फळे, नट किंवा ओट्स यांसारख्या संपूर्ण धान्यांसह दही एकत्र सेवन करण्याची शिफारस केली गेली आहे. हे मिश्रण ॲसिडिटीचा धोका कमी करते आणि पौष्टिक मूल्य वाढवते.
थंड वातावरणात सेवन टाळा – जर तुम्हाला सर्दी किंवा सायनसची समस्या असेल, तर हिवाळ्यात सकाळी दही खाणे टाळा. जेव्हा शरीर अधिक सक्रिय असेल, तेव्हा तुम्ही खाऊ शकता.
खोलीच्या तपमानावर– थंडीच्या दिवसांत फ्रिजमधून काढलेले दही खाऊ नका; तर ते खोलीच्या तपमानावर येऊ द्या.