
तानाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दत्तात्रय पाटील पंच यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम कॉलेज, आटपाडी येथे पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे प्रथमच भव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे औचित्य तानाजीराव पाटील (अध्यक्ष) यांच्या वाढदिवसानिमित्त साधण्यात आले आहे.
ही स्पर्धा सांगली जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने दिवस-रात्र प्रकाशझोतात खेळवली जात असून, खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्याचा सकारात्मक उपक्रम राबविण्यात आला आहे. उद्घाटन प्रसंगी तानाजीराव पाटील, धर्मेशभैया पाटील, विटा येथून आलेले माजी नगरसेवक संजय तारळेकर, प्रताप सुतार, विजय जाधव, अस्लम मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
दत्तात्रय पाटील पंच, सभापती संतोष पुजारी, अरविंद चव्हाण, साहेबराव पाटील, विनायक मासाळ, मनोज नांगरे पाटील, रामदास सूर्यवंशी, दत्तात्रय चव्हाण, विजय देवकर, चंदू भोसले, बाळासाहेब होनराव, राजेश नांगरे पाटील, मुन्ना तांबोळी, पृथ्वीराज पाटील, भारत शेठ कदम, प्रमोद कदम, विजय सरगर, रमेश कातुरे, तानाजी मामा यमगर, दादा शेठ कचरे, शंकर बापू चव्हाण, शहाजी बापू जाधव, सुबराव पाटील, सुनील तळे, बाळासाहेब मोठे, विजय चव्हाण, भगवान पाटील, विश्वजीत कदम, बाळासाहेब बाड, तानाजी चव्हाण, अभिजीत देशमुख, नंदकुमार कदम यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
स्पर्धेत सहभागी संघांसाठी भरघोस पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांक 1,00,001/- व चषक, द्वितीय क्रमांक 50,001/- व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांक प्रत्येकी ₹ 35,001/- व चषक याशिवाय, मालिकावीर साठी ₹ 15,000/- चे पारितोषिक, तसेच उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज यांना प्रत्येकी ₹ 10,000/- रोख रक्कम दिली जाणार आहे.
या स्पर्धेमध्ये सांगली जिल्हा व जिल्ह्याबाहेरील एकूण १६ संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. प्रारंभिक दोन दिवसांमध्ये पावसाचे सावट असतानाही आयोजकांनी अथक परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वीपणे सुरू ठेवली आहे. खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह असून प्रेक्षकांचाही प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर लाभत आहे.
जननायक दत्तात्रय पाटील पंच यांच्या विशेष प्रयत्नातून ही स्पर्धा “सांगली जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन”च्या अधिकृत यूट्यूब वाहिनीवर थेट प्रक्षेपित करण्यात येत आहे. त्यासाठी “पृथ्वीराज स्पोर्ट्स लाईव्ह” चे विशेष सहकार्य लाभत आहे. स्पर्धेच्या नियोजनबद्ध व पारदर्शक व्यवस्थेसाठी सांगली जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे मान्यता प्राप्त पंच हणमंत देसाई (रांजणी), कृष्णदेव पाटील (सोनी), सिद्धू गुरव (अंकलगी) हे जबाबदारी सांभाळत आहेत. स्पर्धेचे समालोचन रोशन पाताडे (मुंबई), गौरव पवार (वांगी) आणि राज वाघमारे (पंढरपूर) यांच्या दमदार शैलीत रंगतदार पद्धतीने सादर होत आहे.
ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ मिळवून देणारा हा उपक्रम तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या स्पर्धा घेऊन युवा खेळाडूंना संधी देण्याचा मानस आहे.
दत्तात्रय पाटील (पंच)
युवा नेते, आटपाडी