बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात बी.ए. पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

0
257

माणदेश एक्सप्रेस न्यूज

आटपाडी/प्रतिनिधी :  श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात कला शाखेतील बी.ए. प्रथम वर्षच्या नव्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात आटपाडी तालुक्याचे भाग्यविधाते स्व. श्रीमंत बाबासाहेब देशमुख (दादा) यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले होते. यावेळी इंग्रजी विभाग प्रमुख ज्येष्ठ प्रा. डॉ. जे. ए. कुलकर्णी, इतिहास विभाग प्रमुख प्रा. सदाशिव मोरे, भूगोल विभाग प्रमुख डॉ. अमोल मोरे, हिंदी विभाग प्रमुख प्रा. गणपत नांगरे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ऋतुजा कुलकर्णी, मराठी विभाग प्रमुख प्रा. विजय शिंदे आदी उपस्थित होते.

 

मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. जयंत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना जिद्द, मेहनत आणि शिस्त यांचा आधार घेत स्वतःचे करिअर घडविण्याचे आवाहन केले. “आपले जीवन समाजाच्या उपयोगी पडावे, विवेक, शिस्त आणि आत्मविश्वास यांचा संगम साधून जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवावा,” असे त्यांनी सांगितले.

 

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. भोसले यांनी विद्यार्थ्यांना “यशासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही” हे अधोरेखित केले. “आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहा, चारित्र्य, नम्रता आणि शालीनतेने युक्त व्यक्तिमत्व घडवा, स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जाऊन समाजसेवा करा,” असे मार्गदर्शन त्यांनी केले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शहाजी पारसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सदाशिव मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here