मुलींना इम्प्रेस करायचय? या ‘३’ रंगाचे कपडे बनवतील तुम्हाला रुबाबदार !

0
262

आजकाल तरुणाईला फॅशनचे क्रेझ आहे. कपडे निवडताना मुली असो किंवा मुलं फार च्युझी होतात. फॅशन, स्टाईलची जाण असणाऱ्या मुलांचा अप टू डेट राहण्याकडे अधिक कल असतो. मुली देखील मुलांच्या स्टायलिश लूकमुळे इम्प्रेस होतात. इतकंच नाही तर कपड्यांचे काही विशिष्ट रंग पुरुषांची पर्सनालिटी अधिक उठावदार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. एका सायकोलॉजिकल रिसर्चमधून हे सिद्ध झाले आहे की, या ३ रंगाचे कपडे घातल्यानंतर पुरुष अधिक आकर्षक दिसतात.

लाल

इतर रंगांच्या तुलनेत लाल रंग अधिक लक्षवेधी ठरतो. लाल रंगाकडे सामान्यतः लोक अधिक आकर्षित होतात, असे म्हटले जाते. विशेषतः मुलींना हा रंग अधिक भावतो. याशिवाय लाल रंग हा स्टेटस आणि आत्मविश्वासाचे प्रतिक आहे. त्यामुळे या रंगाचे कपडे घातल्याने मुलींच्या नजरा आपसुकच तिकडे वळतात.

काळा

काळा हा मुलींचा सर्वात आवडता रंग असल्याचे मानले जाते. त्यामुळेच डेटवर काळ्या रंगाचे कपडे घालून जाणे मुलांच्या पथ्यावर पडेल. त्याचबरोबर या रंगाचे कपडे घातल्याने पुरुष अधिक कॉन्फिडेंट आणि सेक्सी दिसतात.

निळा

लाल आणि काळ्या रंगाव्यतिरिक्त निळा रंग देखील पुरुषांच्या स्मार्टनेसमध्ये भर टाकतो. क्लासी आणि इंटेलीजेंट लूकसाठी निळा रंगाचे कपडे परफेक्ट ठरतील.

याशिवाय असे काही रंग आहेत जे मुलींना अजिबात आवडत नाहीत. केशरी आणि ब्राऊन हे त्यापैकीच दोन.