“मैत्रिणीचाच विश्वासघात! अल्पवयीन मुलीला खोलीत डांबून वेश्याव्यवसायास भाग पाडलं”

0
264

माणदेश एक्सप्रेस न्युज|बिलासपूर :

शाळकरी मुलींच्या प्रामाणिक मैत्रीचा गैरफायदा घेत विश्वासघाताच्या काळ्या कृत्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यातील सरकंडा भागात १६ वर्षीय मुलीला तिच्याच अल्पवयीन मैत्रिणीने फसवून खोलीत डांबलं आणि अमानुष प्रकाराला सामोरं जावं लागलं. या घटनेने मैत्रीच्या नात्याला काळीमा फासला आहे.


पीडित मुलगी नववीत शिकत होती. मात्र, शिक्षणात विशेष रस नसल्याने तिने शाळा सोडली. यावरून तिचा कुटुंबीयांशी वाद झाला. संतापाच्या भरात तिने ८ ऑगस्ट २०२५ रोजी घर सोडलं व फोन करून ती आपल्या मैत्रिणीकडे गेली. तिचं घर सोडून जाणं परिवारासाठी धक्कादायक ठरलं. बराच शोध घेऊनही ती सापडली नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी अपहरणाचा संशय व्यक्त करीत पोलिसांत धाव घेतली.


तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. मुलीने चौकशीत सांगितले की, ती लिंगियाडीहमध्ये राहणाऱ्या मैत्रिणीकडे गेली असता, तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला गेला. मैत्रीण व तिच्या आईने तिला गोड बोलून रायगड येथे आणलं. तिथे एका खोलीत तिला डांबण्यात आलं.


मुलीच्या जबाबानुसार, तिला जबरदस्तीने दारू पाजण्यात आली आणि वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आलं. विरोध केल्यास मैत्रीण व तिची आई मिळून तिला मारहाण करायच्या. वेगवेगळ्या लोकांसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवण्याची वेळ तिच्यावर आली. या नराधमांनी तिच्या निरागसतेचा निर्दयी खेळ केला.


घटनेबाबतची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी समोर आल्यानंतर सरकंडा पोलीसांनी तत्काळ कारवाई केली. पीडितेचे जबाब नोंदवून पोलिसांनी अल्पवयीन मैत्रीण, तिची आई आणि वेश्याव्यवसायात सामील एका आरोपीसह चौघांना अटक केली आहे. पोलिस या प्रकरणाचा सर्वांगीण तपास करत असून आरोपींविरुद्ध कठोर शिक्षा करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.


या घटनेमुळे बिलासपूर परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. एका निरागस अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा केलेला गैरफायदा आणि मैत्रीच्या नात्यालाच घातक विश्वासघात ठरलेली ही घटना समाजमनाला हादरा देणारी आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here