
गेल्या काही दिवसांपूर्वीच महाकुंभ २०२५ ची सांगता झाली आणि त्यानंतर प्रयागराजच्या रस्यांवर एक अनोख दृश्य पाहाण्यासाठी मिळालंय.व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये,एक व्यक्ती यमराजांच्या अवतारात शहरभर फिरत असताना दिसतोय.व्यक्तीच्या या हटके लुकमुळे स्थानिक नागरिक आश्यर्यचकित झाले आहेत.विशेष म्हणजे या व्हिडिओत अजून काय खास आहे ते पाहण्यासाठी व्हायरल होत असलेला व्हिडिओ एकदा पाहा.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक सार्वजनिक रस्ता दिसून येतोय.या रस्त्यावर एक व्यक्ती यमराज यांच्या वेशात येतो आणि त्याला पाहण्यासाठी लोकांनी रस्त्यावर गर्दी केलेली दिसते.विशेष म्हणजे त्या व्यक्तीची बाईकपण खुपच हटके दिसून येत आहे.रस्त्यावर असलेल्या काही व्यक्तींनी सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आहे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत तर हजारो लाईक्स व्हिडिओला मिळाले आहे शिवाय लाखोंच्या संख्येने व्ह्यूजही व्हिडिओला मिळाले आहेत.