VIDEO: शेतकऱ्याच्या लेकीचा नाद नाय! भुईमुगाच्या शेंगा तोडण्यासाठी जबरदस्त जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी हा जुगाड नक्की करा

0
0

Farmer Viral Video: देसी जुगाडच्या बाबतीत भारतीयांचा हात कोणीही पकडू शकत नाही. यात हल्ली शेतीच्या कामातही अनेक प्रकारचे जुगाड वापरले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचतोय आणि पैशांची देखील बचत होतेय. शिवाय शेतीच कामही योग्य पद्धतीने होत असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर तऱ्हेतऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं प्रेक्षकांचीही मनं जिंकून घेतली आहे. शेतात शेतकरी किती राबत असतो याची आपल्यालाही कदाचित जाणीवही नसेल. सध्या शेतकऱ्यांच्या सक्षमीकरण करणाऱ्याकडेही केंद्र आणि राज्य सरकारचा भर आहे. आपला देश हा शेतीप्रधान आहे. त्यामुळे आपल्याकडे शेतीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. परंतु सध्या असाच एक शेतात व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शेतकऱ्याचा जूगाड पाहून नेटकऱ्यांनी त्याचे अपार कौतुक केले आहे.

 

शेतात भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी या शेतकऱ्याने भन्नाट आयडिया लावली आहे. शेतात काम करणारे शेतकरी या व्हिडिओत दिसून येत आहेत. विशेष म्हणजे शेतातील भुईमुगाच्या शेंगा काढणीसाठी आल्यानंतर ते झाड जमिनीतून उपटून घेतल्यानंतर चक्क दुचाकीच्या सहाय्याने या शेंगा वेगळ्या करण्यात आल्या आहेत. जुगाडू लाईफ हॅक्स या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला आणि पुरुष शेतकरी शेतात काम करताना दिसत आहेत. त्यांजवळ एक स्पेंडर दुचाकी दिसून येत असून या दुचाकीच्या चाकाचा वापर करुन ते शेंगा झाडापासून वेगळ्या करत आहेत. मानवी हातापेक्षा गाडीच्या स्पीडमुळे या शेंगा लवकर वेगळ्या होताना दिसून येते. सोशल मीडियावर नेटीझन्सला शेतकऱ्याचा हा जुगाड चांगलाच पसंत पडला आहे. इंजिनिअरची पदवी घेतेल्या विद्यार्थ्यांपेक्षाही एखाद्या शेतकऱ्याचं डोकं फास्ट चालत असतं, हेच या व्हिडिओतून दिसून येतं. शेतकऱ्यांची ही भन्नाट आयडिया सोशल मीडियावर व्हयरल होत आहे.

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here