ज्येष्ठ निर्माते आणि हैदराबाद फिल्मसिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

0
9

ज्येष्ठ निर्माते आणि हैदराबाद फिल्मसिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे 8 जून रोजी सकाळी निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामोजी राव यांना 5 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वृत्तानुसार, रामोजी राव यांचे पार्थिव त्यांच्या फिल्मसिटी येथील निवासस्थानी नेण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता नरेंद्र मोदींपासून चिरंजीवी आणि राम गोपाल वर्मापर्यंत अनेक चित्रपटसृष्टींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी रामोजी राव यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.

रामोजी राव यांना भारतरत्न देऊन सन्मान करावा – एसएस राजामौली

एसएस राजामौली यांनी रामोजी राव यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलं आहे की, ‘एका व्यक्तीने 50 वर्षे हिंमत न हारता, कठोर परिश्रम आणि नाविन्यपूर्ण प्रयत्न करून लाखो लोकांना रोजगार आणि आशा दिली. रामोजीराव यांना आदरांजली वाहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करणे.’

पीएम मोदींनी व्यक्त केला शोक –

रामोजी राव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की, रामोजी राव यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. भारतीय माध्यमांमध्ये क्रांती घडवणारे ते द्रष्टे होते. त्यांच्या योगदानाने पत्रकारिता आणि चित्रपट जगतावर अमिट छाप सोडली. आपल्या उल्लेखनीय प्रयत्नांद्वारे, त्यांनी मीडिया आणि मनोरंजनाच्या जगात नाविन्य आणि उत्कृष्टतेचे नवीन मानक स्थापित केले आहेत. रामोजी राव गरू हे भारताच्या विकासाविषयी अत्यंत तळमळीचे होते. त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या ज्ञानाचा लाभ घेण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. या कठीण काळात त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि असंख्य चाहत्यांचे सांत्वन. ओम शांती.

 

चिरंजीवी व्यक्त केला शोक –

दक्षिणेतील मेगास्टार चिरंजीवी यांनी रामोजी राव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सोशल मीडियावर रामोजी राव यांचा फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, मेरू पर्वत असा पर्वत आहे जो कोणाच्याही पुढे झुकत नाही.