
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : राज्यात जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) लावण्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. दिनांक 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या परिवहन संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, परवानाविषयक कामकाज व खाजगी संवर्गातील वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण कामकाज वगळून वाहन हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये (RC) पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढविणे व उतरविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, ना-हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे इत्यादी वाहनविषयक सर्व कामकाज उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसविल्याशिवाय दि. 16 जून 2025 पासून करण्यात येणार नाही, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.