केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा 2 वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले-‘कधी पूर्ण होणार आश्वासन?’

0
208

 

साधारणतः दोन वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोक नाक्यांबाबत एक महत्वाचा निर्णय घेतल्याची माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, राष्ट्रीय महामार्गांवर 60 किमीच्या आत कोणताही टोल प्लाझा नसणार आणि पुढील तीन महिन्यांत या नियमांची पूर्ण अंमलबजावणी होईल याची ते खात्री करतील. आता दोन वर्षानंतर हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. 2022 मध्ये संसदेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनी ही टिप्पणी केली होती.

गडकरी म्हणाले होते की, ‘टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या स्थानिकांना आम्ही त्यांच्या आधार कार्डनुसार पास देऊ. मी खात्री देतो की 60 किलोमीटरच्या आत एकच टोल प्लाझा असेल. जर 60 किलोमीटरमध्ये दुसरा टोल चालू असेल, तर तो पुढील 3 महिन्यांत बंद होईल.’ आता दोन वर्षे झाली तरी, मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ-