काँग्रेस आणि मनसे युतीवर विवाद का?उद्धव ठाकरे-राज ठाकरे युतीवर काय म्हणाले?

0
37

माणदेश एक्सप्रेस न्यूज, दिल्ली:

महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युतीचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी झालेल्या उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आमच्या दोघांभावांमध्ये तिसऱ्यांना बोलण्याची गरज नाही.” या विधानाने मनसे आणि शिवसेना युतीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

राज ठाकरे यांनीही आपल्या पदाधिकाऱ्यांना युतीचा निर्णय योग्य वेळी घेणार असल्याचे सांगितले असून, परंतु त्यांच्या वक्तव्यांवरून असा अंदाज वर्तविला जात आहे की, ते काँग्रेससोबत युतीची भूमिका घेऊ इच्छित नाहीत. उद्धव ठाकरे काँग्रेस नेतृत्वातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचा घटक असून, त्यामुळे मनसे-शिवसेना युतीबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.

शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असून, “राज ठाकरे मनसेसोबत युतीच्या चर्चाही करत आहेत आणि राहुल गांधींच्या भेटीचीही तयारी करत आहेत, ही दुहेरी भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हितकारक नाही,” असे ते म्हणाले.

राजकारणातील या तणावामुळे महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत सुद्धा अनिश्चितता निर्माण झाली आहे. काही राजकीय तज्ज्ञांच्या मते, शिवसेना-मनसे युती जरी होऊ शकली तरी, काँग्रेसचा सहभाग नसेल तर महाविकास आघाडीचा पूर्वीचा सामर्थ्य टिकवणं कठीण आहे.

येत्या काही दिवसांत या युतीसंबंधी निर्णायक घोषणा अपेक्षित आहेत. महाराष्ट्राच्या पुढील राजकीय चित्रासाठी हे महत्त्वाचे ठरणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here