महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात रविवारी एका इमारतीतील घरात सिलिंग प्लास्टर कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेतर घरातील दोन जण जखमी झाले आहे अशी माहिती नागरि अधिकाऱ्यांनी दिली. ही घटना दिवा परिसरातील सुमारे 10 वर्षे जुनी असल्याचे माहिती मिळत आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दिवा परिसरात 10 वर्षे जुनी असलेल्या सात मजली इमारतीत सिलिंग प्लास्टर कोसळला. पहाटे 4.30 च्या सुमारास ही घटना घडली. सिलिंग दोघांच्या अंगावर कोसळली. भरपूर पावसामुळे सिंलिगमधून गळती सुरु झाली होती. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन ताडवी यांनी दिली.
सातव्या मजल्यावर असलेल्या घरातील रहिवासी पहाटे झोपले होते. झोपेच्या अवस्थेत बेडरूमचे सिलिंग प्लास्टर पडले आणि दोघे जखमी झाले. अंकित सिंग (28) आणि सोनम सिंग (26) असं जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांना कळवा येथील नागरी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले.
माहिती मिळताच, स्थानिक अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी आले आणि सिलिंग प्लास्टर हटवले.