डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, चीनची अचंबित करणारी घोषणा;भारतीय युवकांसाठी मोठी संधी

0
253

माणदेश एक्सप्रेस न्यूज | नवी दिल्ली :
‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणाअंतर्गत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयांचा फटका केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला बसत आहे. भारत-अमेरिका व्यापार तुटीचा दाखला देत ट्रम्प यांनी ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादले, तर दुसरीकडे अमेरिकेत नोकरीसाठी सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या H-1B व्हिसाच्या शुल्कातही मोठी वाढ केली आहे. यामुळे अमेरिकेचे आकर्षण कमी होत चालले असून, या धक्क्याचा फायदा घेण्यासाठी चीनने चलाखीने नवा डाव टाकला आहे.


चीनने नुकताच K व्हिसा सुरू केला असून, हा व्हिसा जगभरातील कुशल कामगार, वैज्ञानिक, संशोधक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांना आकर्षित करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. अमेरिकेच्या H-1B व्हिसासारखाच हा व्हिसा समजला जातो, परंतु त्यातील लवचिकता आणि संधी अधिक आकर्षक असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

७ ऑगस्ट रोजी चीनच्या सरकारने या व्हिसाची घोषणा केली होती. त्यावेळी फारशी चर्चा झाली नव्हती. मात्र ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या शुल्कवाढीचा निर्णय घेतल्यानंतर, चीनच्या या धोरणाला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे.


चीनने या व्हिसाद्वारे स्पष्ट उद्दिष्ट ठेवले आहे – विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, अभियांत्रिकी क्षेत्रात वेगवान प्रगती साधणे.
चीनचे परराष्ट्रमंत्री गुओ जियाकून यांनी याबाबत सांगितले की –

“आम्हाला जगभरातील कुशल बुद्धीजीवी, संशोधक आणि तज्ज्ञ चीनमध्ये यावेत अशी इच्छा आहे. ज्ञान, विज्ञान आणि संशोधनाची देवाणघेवाण व्हावी, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.”

या धोरणामुळे अमेरिका, युरोप किंवा इतर देशांकडे जाणारे अनेक कुशल कामगार आता चीनकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


भारतातील लाखो विद्यार्थी आणि IT क्षेत्रातील अभियंते अमेरिकेत उच्च पगाराच्या नोकरीसाठी प्रयत्न करतात. मात्र, ट्रम्प यांच्या धोरणामुळे अमेरिकेतील मार्ग कठीण होत आहे. अशा परिस्थितीत चीनकडून उपलब्ध करून दिला जाणारा ‘K व्हिसा’ हा भारतीय युवकांसाठी पर्याय ठरू शकतो.

भारताच्या स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कुशल तरुणांवर जगभरातील देश डोळा ठेवून आहेत. अमेरिकेच्या धोरणामुळे निर्माण झालेली पोकळी चीन आपल्या ‘K व्हिसा’ धोरणातून भरून काढू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.


ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणामुळे परदेशातील कामगारांना अमेरिकेत प्रवेश करणे अधिक कठीण झाले आहे. परिणामी भारतीयांसह इतर देशांतील तरुण पर्याय शोधत आहेत. याचवेळी चीनने टाकलेला हा डाव अमेरिकेसाठी मोठं डोकेदुखीचं कारण ठरू शकतो.
विशेषत: अमेरिकेत जाण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्यानंतर चीनकडे वळणारा तरुणाईचा ओघ ट्रम्प प्रशासनासाठी नवा ‘धक्का’ ठरू शकतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here