पुणे-बंगळूरु महामार्गावर तिहेरी अपघात; एक ठार, १६ जण जखमी

0
364

माणदेश एक्स्प्रेस न्यूज/कोल्हापूर – पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली एमआयडीसी परिसरात तिहेरी अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर १६ प्रवासी जखमी झाले आहेत.

 

माहितीनुसार, पुण्याहून बेंगळूरुकडे निघालेल्या खासगी ट्रॅव्हल्सने मालवाहतूक कंटेनरला जोरदार धडक दिली. या धडकीत ट्रॅव्हल्समधील क्लिनर रोहन कुलकर्णी (वय ३०, खडकलाट, बेळगाव) जागीच ठार झाला. यानंतर ट्रॅव्हल्सला मागून येणाऱ्या कारनेही जोरात धडक दिल्याने तिहेरी अपघात झाला.

 

अपघातानंतर प्रवाशांनी जोरदार आरडाओरडा केला. शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्र, महामार्गावरची रुग्णवाहिका आणि सीपीआर रुग्णालयातील ७ रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल होत्या. जखमींना त्वरित उपचारासाठी जवळच्या सीपीआर आणि खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून काहींची अवस्था गंभीर आहे.

 

शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड आणि उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. शिरोली पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here