
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवरून रोजचे भविष्य काढले जाते. दैनंदिन राशीभविष्य हे केवळ तुमच्या नोकरी, व्यवसाय, व्यवहार आणि आरोग्यावर परिणाम करत नाही तर कौटुंबिक जीवन, मित्रमैत्रिणींसोबतचे संबंध आणि सामाजिक जीवनातील बदलही अधोरेखित करते. आज म्हणजेच 1 सप्टेंबर 2025 रोजी बारा राशींवर वेगवेगळे परिणाम होताना दिसत आहेत. काही राशींना धनलाभाचा योग आहे तर काहींनी आर्थिक निर्णय घेताना अधिक सावध राहणे गरजेचे आहे. पाहूया, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे :
मेष (Aries)
आजचा दिवस सामान्य राहील. प्रवासाची शक्यता आहे. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा योग संभवतो. नात्यातील भावना व्यक्त करण्यासाठी चांगला दिवस. जुनं प्रेम परत आलं तर वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो.
वृषभ (Taurus)
वृषभ राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक स्थैर्य मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. नोकरी आणि व्यवसायात यशाची गती वाढेल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात चांगले यश मिळेल. कुटुंबासोबत आनंददायी क्षण घालवाल.
मिथुन (Gemini)
आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा आहे. कामाच्या ठिकाणी थोडा ताण राहील. मात्र सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. गुंतवणुकीसाठी नवीन पर्यायांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. वाद टाळणे हितावह ठरेल.
कर्क (Cancer)
कर्क राशीच्या व्यक्तींना आर्थिक व करिअरच्या क्षेत्रात आज शुभ दिवस आहे. सन्मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरी व व्यवसायात उत्तम कामगिरी होईल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील.
सिंह (Leo)
कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. भौतिक सुखसोयी वाढतील. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा पगारवाढीचा लाभ होऊ शकतो. व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल. कुटुंबासोबत मौजमजा होईल.
कन्या (Virgo)
आज सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत उतावळेपणा करू नका. व्यवसायातील कागदपत्रे नीट तपासूनच डील साइन करा. जोडीदाराला आवश्यक तेवढा अवकाश द्या.
तूळ (Libra)
आज आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. विचारपूर्वक खर्च करा. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल, मात्र भूतकाळावर चर्चा टाळा. करिअरमध्ये ताण जाणवेल.
वृश्चिक (Scorpio)
आजचा दिवस तुमच्यासाठी वरदानासारखा आहे. घर-ऑफिसमध्ये तुमच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक होईल. भौतिक सुखसोयी वाढतील. नोकरीत प्रमोशन व पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.
धनु (Sagittarius)
आज महत्त्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर येईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. प्रेम जीवनात समाधान मिळेल.
मकर (Capricorn)
दिवस सामान्य आहे. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका. गुंतवणूक करण्यापूर्वी संशोधन करा. उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधा.
कुंभ (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल घडतील. कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे. करिअरमधील अडथळे दूर होतील. कुटुंबासोबत सहलीचा आनंद घेता येईल.
मीन (Pisces)
आजचा दिवस शुभ आहे. थांबलेली कामे पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. ऑफिसमध्ये तुमच्या कामगिरीची दखल घेतली जाईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल.


