आजचे राशी भविष्य 25 July: पैसा पैसा पैसा…आर्थिक भाग्य आज ‘या’ राशीच्या बाजूने, जाणून घ्या तुमची रास

0
17286

 

मेष: आजचा दिवस तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढवणारा असेल. आज तुम्हाला एकाचवेळी अनेक कामे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही व्यस्त व्हाल. तुमचा रखडलेला पैसा तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन मिळेल. धार्मिक कार्यात अग्रेसर असाल. आज तुमच्या समोर काही आव्हाने उभे ठाकतील. पण घाबरून जाऊ नका. त्यावर मात करा.

वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. घरात लग्न सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असेल. त्यामुळे घरातील सर्व सदस्य त्यात व्यस्त होतील. कोणत्याही कामाची घाई करू नका. चांगलं काम केल्यास अधिकारी तुमच्या कामाचं कौतुक करतील. समाजात तुम्हाला नवीन ओळख मिळेल. विद्यार्थ्यांना आज एखादा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. दूरचा प्रवास होण्याची शक्यता आहे. वाहने जपून चालवा.

मिथुन: आजच्या दिवशी जीभेवर नियंत्रण ठेवा. इतरांशी वागताना नीट वागा. तुमचे विरोधक तुमच्यावर टपलेलेच आहेत. त्यामुळे त्यांच्या जाळ्यात अडकाल असं काही करू नका. जीवनसाथीची भरपूर साथ आणि सहवास मिळेल. एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. काही सामाजिक कार्यात भाग घेण्याची शक्यता आहे. एखाद्याला वचन दिले असेल तर ते पूर्ण करा. मुलीसाठी एखादं सरप्राईज गिफ्ट घरी न्याल.

कर्क: आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे. एखाद्या बड्या व्यक्तीकडून तुम्हाला गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या विचाराने तुमची अनेक कामे मार्गी लागतील. जीवनसाथीला बाहेर फिरायला घेऊन जाण्याची शक्यता आहे. तुम्ही बिझनेसमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर त्यात लगेच बदल करा. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या लोकांना नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. कोणत्याही कागदपत्रांवर वाचल्याशिवाय सही करू नका.

सिंह: आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र जाणार आहे. पण आजचा दिवस लाभदायक असेल. तुम्ही तुमच्या कामांपेक्षा इतरांच्या कामावर अधिक लक्ष द्याल. नोकरीच्या ठिकाणी वादविवाद करणं टाळा. नाही तर तुमचं नुकसान होईल. लोखंडाचा व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगली वर्क ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. लोकल ट्रेनमधून प्रवास करताना इतर प्रवाशांशी वाद टाळा. आजही तुम्ही नेहमीप्रमाणे ऑफिसला लेट पोहोचाल. कुटुंबातील सदस्यांबाबतचा जिव्हाळा वाटेल. आयुष्यातील फ्रस्टेशन दूर होण्याचा आजचा दिवस आहे. एखाद्या व्यक्तीचं तुमच्या आयुष्यात आगमन होईल.

कन्या: आजचा दिवस तुमच्या कला आणि कौशल्यात सुधारणा करणारा आहे. रचनात्मक कार्याशी तुम्ही जोडले जाल. नव्या कामात रुची निर्माण होईल. विद्यार्थी नोकरीसाठी एखादा कोचिंग करू शकतात. मुलांच्या करिअरची चिंता सतावेल. वाहनांपासून जपून राहा. कुटुंबातील संपत्तीचा वाद संपुष्टात येईल. तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्ताने जावे लागेल. आजच्या दिवशी उशिरापर्यंत ऑफिसात काम करावे लागेल. प्रेयसीसोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल. मित्रांसोबत पिकनिकला जाण्याचा योग आहे.

तुळ: राशी आजच्या दिवशी अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. कार्यक्षेत्रात तुमच्यावर कामाचा बोझा पडेल. नोकरीसाठी विविध ठिकाणी प्रयत्न कराल. त्यामुळे फायदा होण्याची शक्यता आहे. प्रेमाची भावना मनात राहील. तुम्हाला आज अचानक धन प्राप्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा मोठा खर्च निभावून जाईल. आईवडिलांशी एखाद्या योजनेवर चर्चा कराल. गावाकडे जाण्याचा योग आहे. कोर्टाची कामे मार्गी लागतील. अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे मार्गी लागतील.

वृश्चिक: आजचा दिवस संभ्रमाचा राहणार आहे. आज मोठे निर्णय घ्याल. उद्योगात काही योजनांवर लक्ष ठेवावं लागेल. महिना संपत आल्याने टार्गेट गाठण्यासाठी प्लानिंग करावं लागणार आहे. नाहीतर मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. लग्नाळूंचा विवाह जुळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात खटके उडतील. त्यामुळे सामंजस्याने वागा. एखाद्या विवाह सोहळ्यात भाग घ्याल. नातेवाईकांकडे जाण्याचा योग आहे. वाहन खरेदी करताना सावधानता बाळगा.

धनु: आजचा दिवस प्रकृतीसाठी चढउताराचा असेल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी इन्कम सोर्स वाढवण्याचा प्रयत्न कराल. त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना पार्ट टाईम जॉब करण्यासाठी वेळ मिळेल. विदेशात जाण्याचा योग आहे. आज चांगली आवक होणार आहे. पण खर्चही तितकाच करावा लागणार आहे. कुणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका. पैसे परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

मकर: आळस हा माणसाचा शत्रू आहे. त्यामुळे आळस झटकून कामाला लागा. आजचा दिवस तुम्हाला नव्या गोष्टी शिकवणारा ठरणारा आहे. जीवनसाथी सोबत डेटिंगला जाल. घरात भरपूर अन्नधान्य साठवून ठेवाल. हॉटेलिंग करण्याची इच्छा होईल. चार पैसे खिश्यात आल्यावर ते तुमच्या हातात कधीच टिकत नाहीत. आजही तुम्हाला त्याची परिचिती होईल. कुणाच्याही व्यक्तिगत आयुष्यात डोकावू नका. नको त्या भानगडीत अडकून जाल. त्यामुळे आपल्या कामावर फोकस करा.

कुंभ: अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी प्रगतीचे मार्ग खुले होतील. आपल्या बुद्धी आणि विवेकाने कार्यक्षेत्रात मोठी झेप घ्याल. आज भाग्य तुमच्या हातात हात घालून चालेल. पण खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. नाही तर तुम्हाला पोटाशी संबंधित विकार होऊ शकतात. एखाद्या जुन्या मित्राची बऱ्याच वर्षानंतर भेट होण्याची शक्यता आहे. एखाद्या कामानिमित्ताने अचानक प्रवास घडण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांना आज भरपूर मेहनत करावी लागेल. शेजाऱ्यांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. पण नको त्या वादात पडण्यापासून सावध राहा.

मीन: आजचा दिवस तणावग्रस्त राहणार आहे. तुम्ही घरच्या आणि बाहेरच्या समस्यांमुळे त्रस्त राहाल. तुमच्यावर तणाव वरचढ होणार नाही याची काळजी घ्या. तुमचा खर्च वाढेल. त्यामुळे समस्या निर्माण होईल. तुमची दिनचर्या व्यवस्थित ठेवा. त्यामुळे तुम्हाला काही अडचण होणार नाही. धार्मिक कार्यात रुची घ्याल. तुम्हाला तुमच्या आसपास असणाऱ्या लोकांपासून सावध राहावे लागणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. होणारं नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)