
मेष
आज, ऑफिसमध्ये फोन कमी वापरा आणि तुमच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा, अन्यथा संकटात सापडाल. आर्थिक बाबींमध्ये लोकांवर जास्त विश्वास ठेवणे टाळा. आई-वडीलांच्या आशीर्वादाने जुनी , अडकलेली कामं पूर्ण होतील.
वृषभ
व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरू शकते. तुम्ही गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारतील, सौहार्दपूर्ण संबंध टिकतील. तुम्हाला एखादे रहस्य कळू शकेल. जीवन बदलेल.
मिथुन
तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुम्ही एखाद्याला उधार दिलेले पैसे अचानक परत मिळू शकतात. तुमच्या व्यवसायात एखाद्याकडून फायदा होण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे उत्साहही वाढेल.
कर्क
तुम्हाला ऑफिसमध्ये काही कामावर चर्चा, जास्त मेहनत करावी लागू शकते. या राशीखाली जन्मलेल्या आणि मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खास आहे. चांगली बातमी नक्की समजेल.
सिंह
कुटुंबात धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले जाऊ शकते. तुमचे जीवन सुधारण्यासाठी तुम्ही काही सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न कराल. तुमचे आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे.चांगल्या वागण्यामुळे नवे मित्र-मैत्रिणी बनतील.
कन्या
तुमच्या पालकांचा गेल्या काही काळापासून असलेला राग आज कमी होईल. राजकारण आणि सामाजिक कार्यात सहभागी असलेल्यांना दिवस अनुकूल वाटेल. महिलांचा दिवस खूप छान जाईल. व्यापारी आज एखाद्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात. उधारी संपेल, टेन्शन कमी होईल.
तुळ
लाकूड व्यापारात गुंतलेल्यांना आज एक मोठा प्रकल्प मिळेल. लेखक एक नवीन कथा लिहू शकतात जी चांगली पसंती मिळवेल. कुटुंबात नवीन सदस्याची भर पडल्याने सर्वांना खूप आनंद होईल.
वृश्चिक
जर तुम्ही कामानिमित्त बाहेर जात असाल तर तुमच्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या, तुमचे काम यशस्वी होईल. तुमच्या जोडीदाराला आज प्रगतीची चांगली संधी मिळेल. कुरिअर व्यवसायात सहभागी असलेल्यांना आज फायदा होईल.
धनु
कुटुंबियांसोबत क्वॉलिटी टाईम घालवाल, जोडीदाराशीही छान गप्पा माराल. यामुळे तुमचे नातेसंबंध सुधारतील. तुम्ही मित्रांसोबत घरी चित्रपट पाहण्याची योजना आखू शकता. आज तुमची अशा व्यक्तीची भेट होईल जी भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
मकर
एकाग्रतेने केलेले काम फायदेशीर ठरेल. प्रेम जोडीदारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये देखील जाऊ शकता. कोणत्याही जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे टाळावे, नंतर त्रास होईल. तुमचे आरोग्य चांगले राहील. कमीत कमी वेळात जास्तील जास्त काम संपवण्याचा प्रयत्न कराल.
कुंभ
आज तुम्हाला एखाद्या गोष्टीची थोडीशी चिंता असेल, पण ती गोष्ट जवळच्या मित्रासोबत शेअर केल्याने तुम्हाला थोडा आराम मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह चित्रपट पाहण्याचा बेत आखू शकता. तुम्ही एखाद्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहाल, इतर मित्रांमुळे आनंदात दिवस जाईल. आज एखादे नवे स्किल शिकाल.
मीन
आजचा दिवस कंत्राटदारांसाठी आर्थिक लाभाचा असेल. बदलत्या हवामानामुळे तुमची चिंता वाढू शकते. चांगले आरोग्य राखण्यासाठी भरपूर पाणी प्या. तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल करावे लागतील, त्याचा फायदा होईल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
 


