आजचे राशिभविष्य, २९ जानेवारी २०२५ “या” पाच राशींच्या तणावात वाढ, समस्या येतील? ; तुमची रास काय सांगते? ; वाचा सविस्तर

0
13560

मेष
आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेतून पैसे मिळू शकतात. घरी पाहुणे आल्याने खर्चात वाढ होईल. नोकरदार लोकांना वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल.

वृषभ
आरोग्याबाबत जागरुक राहावे लागेल. काही समस्या येतील. खाण्याच्या सवयींकडे लक्ष देणे आवश्यक राहिल. जवळच्या किंवा लांबचा प्रवास पुढे ढकला. मुलांकडून सकारात्मक बातम्या ऐकायला मिळतील.

मिथुन
आज तुम्ही तुमच्या व्यवसायात काही बदल करु शकता. कोणाताही करार करताना विचारपूर्वक करावा. पार्टनरशीपमध्ये सुरु असलेल्या वादाचा तुम्हाला फायदा होईल. घर किंवा दुकानाचा सौदा करणार असाल तर थोडे थांबा, अन्यथा समस्या येतील.

कर्क
आज तुम्ही पैस गुंतवण्याचा विचार कराल. परंतु, विचारपूर्वक निर्णय घ्या. पैसे बुडण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या सहकार्याने आणि सहवासामुळे कौटुंबिक व्यवसायात फायदा होईल. मुलांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता.

सिंह
आज जोडीदारासोबत व्यवसाय करण्याचा निर्णय घ्याल, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. तुमच्यासाठी सरप्राईज पार्टीचे आयोजन केले जाईल. जुन्या मित्रांना भेटाल. घरगुती कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.

कन्या
आज राजकीय दृष्टीकोनातून नशीबाची तुम्हाला साथ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी कोणतेही काम कराल, ज्यात यश मिळेल. सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांना सहकार्याची संधी मिळेल. मालमत्तेशी संबंधित वाद सुरु असतील तर सोडवाल. महत्त्वाच्या कामांवर चर्चा कराल. लव्ह लाईफमध्ये नवीन ऊर्जा येईल.

तुळ
आज तुम्हाला व्यवसायात भरपूर नफा मिळेल. एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे काळजी घ्या. मुलांच्या शिक्षणाशी संबंधित कामासाठी बाहेर जावे लागेल. जोडीदाराच्या आरोग्याबाबत जागरुक राहा.

वृश्चिक
आज तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागेल. तुम्ही धैर्याने सामोरे जाल. कोणतेही काम निर्भयपणे कराल. ज्यात तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. शारीरिक आणि मानसिक त्रास होत असेल तर काम पुढे ढकला.

धनु
आजचा दिवस इतरांच्या सेवेत घालवाल. व्यवसायाकडे लक्ष द्यावे लागेल. भविष्यात तुमच्यासाठी आर्थिक संकटे निर्माण होतील. कुटुंबातील नातेवाईकाकडून चांगल्या वाईट गोष्टी ऐकायला मिळतील. ज्यामुळे तुमची निराशा वाढेल. मुलांकडून समाधानकारक बातम्या ऐकायला मिळतील.

मकर
आज नोकरदार लोकांना काही काम सोपवले जाऊ शकते. सहकाऱ्यांची आवश्यकता भासेल. काम पूर्ण करण्यात यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना कामात लक्ष द्यावे लागेल. आईकडून मदत मिळेल.

कुंभ
आजचा दिवस राजकारणातील लोकांना कठीण जाईल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना तणावाचा सामना करावा लागेल. मालमत्तेशी संबंधित वाद असतील तर तो पुढे ढकला. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांची मदत घ्यावी लागेल. पैसे शेअर बाजारात गुंतवण्याचा विचार कराल.

मीन
आज मालमत्तेशी संबंधित वाद असल्यामुळे शांतपणे सहन करावा लागेल. नात्यात दूरावा येऊ शकतो. सासरच्या लोकांकडून कर्ज मिळेल. पैशांमुळे अडकलेले काम सहज पूर्ण होईल. मुलांची प्रगती पाहून आनंद वाटेल.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धा पसरवत नाही.)