
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई :
देशात डिजिटल पेमेंटच्या वापरात गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत मोबाईलवरून होणारे UPI पेमेंट्स ही दैनंदिन व्यवहाराची गरज झाली आहे. मात्र, अजूनही लाखो लोकांकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट उपलब्ध नाही. अशा लोकांनाही डिजिटल पेमेंटच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्टार्टअप Proxgy ने एक क्रांतिकारक तंत्रज्ञान बाजारात आणले आहे. याचे नाव आहे ThumbPay – ज्याच्या मदतीने QR कोड किंवा स्मार्टफोन न वापरता फक्त अंगठ्याने पेमेंट करता येणार आहे.
काय आहे ThumbPay?
ThumbPay हे एक खास बायोमेट्रिक पेमेंट डिव्हाइस आहे. ग्राहकाने डिव्हाइसवर आपला अंगठा ठेवला की सिस्टम त्याला आधार इनेबल पेमेंट सिस्टम (AEPS) च्या माध्यमातून व्हेरिफाय करते. यानंतर UPI प्लॅटफॉर्मद्वारे थेट बँक-टू-बँक ट्रान्झॅक्शन पूर्ण होतं.
स्मार्टफोन, QR कोड किंवा वॉलेटची गरज नाही
थेट आधार-लिंक्ड बँक अकाऊंट मधून पेमेंट
ग्रामीण, लहान दुकानं, शोरूम, पेट्रोल पंप याठिकाणी सहज वापर
पेमेंट कसं होणार?
ग्राहकाने आपला अंगठा ThumbPay डिव्हाइसवर ठेवायचा
अंगठ्याचा स्कॅन AEPS च्या मदतीने व्हेरिफाय होईल
ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यानंतर UPI सिस्टम व्यवहार पूर्ण करेल
QR कोड, मोबाईल किंवा रोख पैशाची गरज नाही
सिक्युरिटी आणि हायजिनची हमी
Proxgy कंपनीनं ग्राहकांच्या सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य दिलं आहे.
सर्टिफाइड फिंगरप्रिंट स्कॅनर – फ्रॉड डिटेक्शनसह
इनबिल्ट कॅमेरा – व्हेरिफिकेशनसाठी
UV स्टेरेलायझेशन – स्वच्छतेसाठी
अतिरिक्त फीचर्स
ThumbPay केवळ अंगठ्यानेच नाही, तर इतर डिजिटल मोड्सलाही सपोर्ट करतं.
QR कोड आणि NFC पेमेंट सपोर्ट
UPI साउंडबॉक्ससह इंटिग्रेशन
4G आणि वायफाय कनेक्टिव्हिटी
बॅटरीवर ऑपरेट होणारे पोर्टेबल डिव्हाइस
किंमत किती?
कंपनीनं ThumbPay ची किंमत ₹2000 ठेवली आहे. कमी किमतीमुळे हे डिव्हाइस ग्रामीण भागात, छोट्या दुकानदारांमध्ये आणि अगदी पेट्रोल पंपांवरही सहज वापरले जाऊ शकेल.
महत्त्व का आहे ThumbPay ला?
डिजिटल इंडिया मिशनला मोठी चालना
नॉन-स्मार्टफोन वापरकर्त्यांनाही डिजिटल पेमेंटची सुविधा
रोख व्यवहार कमी होऊन पारदर्शक अर्थव्यवस्थेला मदत
ग्रामीण भागातल्या फायनान्शियल इन्क्लूजनसाठी महत्त्वाचं साधन
ThumbPayच्या मदतीने भारतात डिजिटल पेमेंट्सचं नवं पर्व सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. QR कोड, मोबाईल, इंटरनेटशिवाय फक्त अंगठा ठेवून व्यवहार करणं – हे खरोखरच सामान्य ग्राहकांसाठी कमालची सोय ठरणार आहे.