पुण्यात थरारक हल्ला: तीन तरुणांचा कोयत्याने जीवघेणा हल्ला, एक जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद

0
196

माणदेश एक्स्प्रेस न्यूज|पुणे – शहरात दिवसाढवळ्या भररस्त्यात थरारक हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. अशाच एका धक्कादायक प्रकारात विश्रांतवाडी परिसरात तीन तरुणांनी एका ४० वर्षीय व्यक्तीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे, तर एक साथीदार अद्याप फरार आहे.

 

नरेश रामचंद्र तिडंगे (वय ४०) असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते धानोरी रोड, विश्रांतवाडी परिसरात काम करतात. रात्री आठच्या सुमारास तिडंगे हे कामावरून घरी जात असताना तीन तरुणांनी त्यांना अडवून कोयत्याने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. नागरिकांनी धाव घेताच आरोपी तिथून पळून गेले.

 

 

जखमी नरेश तिडंगे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपासातून पुढील माहिती समोर येणार आहे. विश्रांतवाडी परिसरातील या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here