यंदा स्वातंत्र्य दिनी मुंबई आणि महाराष्ट्रासह देशभरात ‘ड्राय डे’; दारुची दुकाने बंद, घ्या जाणून

0
317

भारत यंदा आपला 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. त्यामुळे येत्या 15 ऑगस्टला देशभरात देशभक्ती, अभिमान आणि उत्साहाला भरते येणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था आणि नैतिक जबाबदारी म्हणून महाराष्ट्र आणि देशभरात ‘ड्राय डे’ (Dry Day in India) पाळला जाणार आहे. सहाजिकच देशातील कोणत्याही शहरात, गावात, दुकानात मद्यविक्री केली जाणार (Liquor Shops Closed) नाही. हे शहर मग मुंबई (Dry Day in Mumbai) असो की दिल्ली. केवळ दुकानेच नव्हे तर कोणताही पब अथवा बारही याला अपवाद असणार नाही. भारतीय मद्यविक्री कायद्यान्वये देशभरात ड्राय डे असणार आहे.,

‘ड्राय डे’ का?
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपल्या मरण पत्करले, प्राणाची अहुती दिली, दु:ख सहन केले त्या हुतात्म्यांच्या बलिदानाचे प्रतिक म्हणजे हा दिवस आहे. स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जावा म्हणूनच या दिवशी ‘ड्राय डे’ पाळला जातो. संपूर्ण देशभरात कोठेही मद्यविक्री केली जात नाही.

विविधतेत एकता
भारत हा विविधता आणि भिन्नतेनेच नटलेला देश आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयामध्ये जात, संस्कृती, लिंग, वय, व्यवसाय भेद पाहायला मिळते. असे असले तरी भारतात विविधतेत एकता घट्टपणे पाहायला मिळते. याची प्रचिती 15 ऑगस्टला येते. या दिवशी देशभरातील नागरिक मोठ्या उत्साहात एकत्र येतात. भारतीय स्वातंत्र्यासाठी बलीदान देणाऱ्या योध्यांप्रती आदर व्यक्त करतात. त्यांनी दिलेल्या योगदानामुळेच तर भारतातील नागरिक स्वतंत्र, मुक्त, मुक्त जीवन अभिमानाने जगत आहेत. आपल्या हजारो पूर्वजांच्या याच भावनेचा, भक्तीचा आणि कृतज्ञतेचा आदर करण्यासाठी 15 ऑगस्ट हा दिवस विशेषार्थाने साजरा होतो. याच दिवशी ब्रिटीशांचा युनियन जॅक कायमचा खाली उतरला आणि भारतीय राष्ट्रद्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकला.

भारतीय स्वातंत्र्या दिनाचा उत्साह देशभरातील सर्व शहरे, गाव-खेडी आणि रस्त्यांवरही पाहायला मिळतो. देशभक्तीच्या भावनेने देशातील सर्व गल्ल्या, रस्ते, शहरे उजळून निघतात. लोक, संघटना, संस्था, सरकार – स्थानिक, राज्य, केंद्र- हा दिवस साजरा करण्यासाठी अनेक कार्यक्रम हाती घेतात. देशभक्तीची ही भावना टिकून राहण्यासाठी कोणत्याही कार्यक्रमास कोठेही गालबोट लागू नये यासाठी खबरदारी घेतली जाते. लोकांवर नशेचा अंमल होऊ नये यासाठी देशभरात कोणत्याही ठिकाणी मद्यविक्री सुरु ठेवली जात नाही. संपूर्ण देशातील नागरिक आजही 15 ऑगस्ट 1947 या दिवसाची आठवण मोठ्या अभिमानाने ठेवतात. हा दिवस पाहण्यासाठी देशभरातील नागरिकांनी केलेल्या कष्टांची, समर्पनाची कायम आठवण ठेवतात.