नवीन हेड कोच गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यात जय आणि पराजय दोघांचा सामना केला. सध्या टीम इंडियाला विश्रांती मिळाली आहे. भारतीय टीम आता थेट बांग्लादेश विरुद्ध टेस्ट सीरीज खेळण्यासाठी उतरणार आहे. 19 सप्टेंबर पासून ही टेस्ट सीरीज सुरु होईल. म्हणजे टीम इंडियाला विश्रांतीसाठी महिन्याभराचा वेळ मिळाला आहे. बांग्लादेश विरुद्ध भारताच्या टेस्ट टीममध्ये 4 खेळाडूंच पुनरागमन होऊ शकतं. या चार खेळाडूंमध्ये एका प्लेयरला 15 महिन्यानंतर टीममध्ये स्थान मिळणार आहे.
बांग्लादेश विरुद्ध टेस्ट टीममध्ये ज्या 4 खेळाडूंच पुनरागमन होऊ शकतं, त्यांच्यामध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा हे प्लेयर आहेत. बुमराह, अश्विन आणि जडेजा यावर्षी मार्च महिन्यात शेवटचा कसोटी सामना खेळले होते. पण शमी आपला शेवटचा कसोटी सामना मागच्यावर्षी जूनमध्ये खेळला होता. बांग्लादेश टेस्ट सीरीजसाठी त्याची टीममध्ये निवड झाली तर 15 महिन्यानंतर तो टेस्ट टीममध्ये खेळताना दिसेल.
चीफ सिलेक्टर अजित आगरकर काय बोललेत?
मोहम्मद शमी दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर आहे. मोहम्मद शमीसाठी चांगली बाब ही आहे की, त्याने आता नेट्समध्ये सराव सुरु केलाय. टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी शमीचा सराव पाहिला. त्यानंतर ते म्हणाले की, सगळं काही ठीक राहिलं, तर शमी बांग्लादेश सीरीजमध्ये खेळताना दिसू शकतो. श्रीलंकेविरुद्ध मालिका सुरु होण्याआधीच आगरकर हे बोलले आहेत.
या खेळाडूबद्दल अप्रोच खूप क्लियर
अश्विन बद्दल भारतीय टीम मॅनेजमेंटचा अप्रोच खूप क्लियर आहे. अश्विनला आता फक्त रेड बॉल म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळेल. मार्चमध्ये इंग्लंड विरुद्ध मायदेशात मालिका खेळली. त्यानतंर अश्विन आता बांग्लादेश विरुद्ध टेस्ट सीरीज खेळताना दिसेल. यावर्षी मार्च महिन्यात इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत बुमराह आणि जाडेजा कसोटी संघाचा भाग होते. T20 वर्ल्ड कपमध्येही टीम इंडियाचा भाग होते. श्रीलंकेविरुद्ध T20 आणि वनडे सीरीजसाठी दोघांना आराम देण्यात आला होता. दोन्ही खेळाडू बांग्लादेश विरुद्ध टीम इंडियातून खेळतील अशी अपेक्षा आहे.
ही सीरीज टीम इंडियासाठी का महत्त्वाची?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने बांग्लादेश विरुद्धची ही सीरीज टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. भारतासाठी शमी, बुमराह, जाडेज आणि अश्विनच पुनरागमन सुद्धा महत्त्वाच आहे. शमी आणि बुमराह दोघे भारताची वेगवान गोलंदाजी मजबूत बनवतात. स्पिनमध्ये अश्विन आणि जडेजा या जोडीचा जलवा सगळ्यांनाच माहित आहे.
चार वर्षात सर्वाधिक विकेट कुठल्या भारतीय गोलंदाजाने काढलेत?
मागच्या चार वर्षात हे चौघे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज आहेत. वर्ष 2020 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुमराहने सर्वाधिक 181 विकेट घेतले आहेत. अश्विन 180 विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. जाडेजाच्या नावावर 141 विकेट तर शमीच्या नावावर 127 विकेट आहेत.