
माणदेश एक्सप्रेस न्यूज | आरोग्य विशेष
अनेकांना नकोशी वाटणारी पण शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असणारी भाजी म्हणजे भेंडी! ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही सामान्य वाटणारी भाजी अनेक आरोग्य समस्यांवर रामबाण उपाय ठरते. विशेषतः रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेली भेंडी आणि त्याचं सकाळी पिण्यात येणारं पाणी हे शरीरासाठी अमृतसमान आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.
भेंडी म्हणजे फक्त चविष्ट भाजी नाही, आरोग्यदायी घटकांची खाण!
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तणाव, थकवा, झोपेचा अभाव आणि चुकीची आहारशैली यामुळे विविध आजार जडतात. यासाठी व्यायामासोबतच योग्य आहार घेणंही तितकंच गरजेचं ठरतं. याच पार्श्वभूमीवर कार्डियोलॉजिस्ट आणि फंक्शनल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. चोप्रा यांनी भेंडीच्या गुणधर्मांवर भर दिला आहे.
भेंडीचे चमत्कारिक फायदे:
१) रक्तदाब नियंत्रणात ठेवते
२) टाईप 2 डायबेटीसवर परिणामकारक
३) पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते
४) शरीर हायड्रेट राहतं आणि मेटाबॉलिजम वाढतो
५) फायबरयुक्त असल्याने वजन कमी होण्यास मदत करते
६) हृदयविकाराच्या धोक्यापासून संरक्षण देते
७) मधुमेहाच्या रुग्णांसाठी खास उपाय
डॉ. चोप्रा यांच्या म्हणण्यानुसार, आठ आठवड्यांपर्यंत दर सहा तासांनी १००० मिग्रॅ. भेंडीचे सेवन केल्यास HbA1c लेव्हल कमी करण्यास आणि साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांनी भेंडीचा समावेश आहारात जरूर करावा, असंही ते सुचवतात.
भेंडीचं पाणी कसं तयार करावं?
जर तुम्हाला भेंडीची भाजी खाणं आवडत नसेल, तर खालील पद्धतीने तुम्ही तिचा उपयोग करू शकता:
१) 3-4 ताज्या भेंडी घ्या
२) स्वच्छ धुऊन त्याचे लांबट तुकडे करा
३) एका ग्लास पाण्यात भिजवून ठेवा (रात्रभर)
४) सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या
या पद्धतीने नियमितपणे भेंडीचं पाणी घेतल्यास पचन, वजन नियंत्रण, त्वचेचा तेज, आणि थकवा कमी होण्यास मदत होईल.
मेटाबॉलिजम सुधारण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला
डॉ. चोप्रा सांगतात की, तणाव, झोपेचा अभाव आणि आळसलेली जीवनशैली मेटाबॉलिजमवर मोठा परिणाम करते. त्यामुळे आहारात प्रोटीन, पाणी आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास शरीर ऊर्जावान राहील आणि रोगप्रतिकारशक्ती वाढेल.